फोटो ओळ..जरग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद सादताना आ.देशमुख व इतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..जरग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद सादताना आ.देशमुख व इतर
फोटो ओळ..जरग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद सादताना आ.देशमुख व इतर

फोटो ओळ..जरग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद सादताना आ.देशमुख व इतर

sakal_logo
By

03498
जरग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार सुभाष देशमुख.

आमदार देशमुख यांची
जरग विद्यामंदिरला भेट

कंदलगाव, ता.१८ ः महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर शाळेस सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. आमदार देशमुख सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना शाळेला भेट दिली. इयत्ता पहिलीचे सर्व वर्ग व इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचे वर्ग, शाळा परिसर, संगणक कक्ष, वाचनालय यांची पाहणी केली.
शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, प्रभारी मुख्याध्यापक सुनील पाटील, युवराज सरनाईक यांनी त्यांचे स्वागत केले. मनोहर सरगर यांनी आभार मानले. विविध उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली.
आमदार देशमुख यांनी एक सरकारी शाळा शिक्षण क्षेत्रातील मिळवत असलेल्या नावलौकिकाबद्दल विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शाळेच्या वाटचालीबद्दल अभिनंदन केले. सर्व शिक्षकांची मुले जरगनगर शाळेतच शिकतात याचा आवर्जून उल्लेख करत सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
शीतल शहाणे, किरण पोतदार, वैभव लांबोरे, आबासाहेब कारंडे उपस्थित होते.
आमदार देशमुख यांनी अत्यंत व्यस्त नियोजनामधून वेळात वेळ काढून कोल्हापूरमध्ये येऊन आमच्या शाळेला भेट देतात हा क्षण जरगनगर विद्यालय परिवारासाठी खूपच आनंदाचा आहे. तसेच शाळेला मिळालेल्या एखाद्या पुरस्काराइतकाच महत्त्वाचा आहे, असे
प्रभारी मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01832 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..