फोटो ओळ... गळतीचा संग्रहित फोटो वापरावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ... गळतीचा संग्रहित फोटो वापरावा
फोटो ओळ... गळतीचा संग्रहित फोटो वापरावा

फोटो ओळ... गळतीचा संग्रहित फोटो वापरावा

sakal_logo
By

संग्रहित फोटो वापरावा

जलवाहिनींच्या गळतीचा प्रश्‍न गंभीर

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. १८ ः पाचगाव परिसरातील पंधरा कॉलनींसह सुभाषनगर, जवाहरनगर, साळोखे पार्क, राजेंद्रनगर या परिसराला सुभाषनगर पंपिंगमधून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी व्हॉल्व्ह, जलवाहिनी, सार्वजनीक नळ्यातून सुमारे २५ टक्के पाणी गळतीतून वाया जात असून, या ठिकाणी असणाऱ्या अनेक गळतीची माहिती, ठिकाणे माहीत असूनही केवळ ठेकेदार मिळत नसल्याने गळती कित्येक वर्षापासून आहे त्या स्थितीत आहेत.
मागील दहा-पंधरा वर्षांचा विचार केला तर त्यावेळी महापालिकेच्या पाणी वितरण करणाऱ्या कोकणे मठ(सी, डी वॉर्ड), राजारामपुरी व कावळा नाका (ई वॉर्ड), पाण्याचा खजिना (ए, बी वॉर्ड) या विभागाच्या आपल्या हद्दीतील गळती ज्या त्या वितरण कार्यालयाकडून काढली जात होती. मात्र, तिथून पुढे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष व कामासाठी लागणारा वेळ याचे गणित न जुळल्याने गळती काढण्यासाठी ठेकेदार पद्धत आली.

चौकट
जुनी गळतीची ठिकाणे..
०) जवाहर नगर बिजली चौक(सार्वजनिक नळ),
०) सुभाषनगर मुख्य रस्ता, पपिंग परिसर व्हॉल्व्ह.
०)सुभाषनगर भाजी मंडई
०) शेंडापार्क परिसरातील सर्व एअर व्हॉल्व्ह.
०) आर.के.नगर मुख्य चौक, पाण्याची टाकी परिसर, कॉलनीअंतर्गत १३ गळत्या.
०) आर.के.नगर रिंगरोड.
०)पाचगाव रोड मंडलिक बोरिंग इत्यादी.

चौकट
दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
गळती जुन्या असून त्या ठिकाणी असणाऱ्या दलदलीमुळे दुर्गंधीयुक्त पाणी गळतीत शिरून त्याच पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे.

चौकट
पिण्यासाठी विकतचे पाणी
वारंवार तक्रारी, अधिकाऱ्यांना फोन करूनही गळती निघत नसल्याने स्थानिक नागरिक पिण्यासाठी विकतचे पाणी आणून, आपली तहान भागवित आहेत, तर दुर्गंधीयुक्त, गडूळ नळाचे पाणी खर्चासाठी वापरत आहेत.

कोट
परिसरातील सर्व पाईपलाईन गळतीची पाहणी करून ज्या भागात गळतीआहे त्या विभागांना सूचना देऊन गळती काढून घेऊ. भागातील गळतीबाबत अनेक तक्रारी आहेत.
-हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01835 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..