फोटो ओळ..आर.के.नगर टाकीजवळील गळती काढताना कर्मचारी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..आर.के.नगर टाकीजवळील गळती काढताना कर्मचारी..
फोटो ओळ..आर.के.नगर टाकीजवळील गळती काढताना कर्मचारी..

फोटो ओळ..आर.के.नगर टाकीजवळील गळती काढताना कर्मचारी..

sakal_logo
By

लोगो- Sakal Impact
-
03511
आर. के. नगर ः टाकीजवळील गळती काढताना कर्मचारी.

''ती'' गळती काढण्यास
आर. के. नगरात सुरुवात

कंदलगाव, ता. १९ ः पंधरा दिवसांपासून आर. के. नगर पाण्याच्या टाकी शेजारील वाहिनीतून अखंड वाहणारे पाणी गळती काढून थांबविण्यात आले. या गळतीबाबत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांसह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या आंदोलनामुळे या गळतीची चर्चा परिसरात होती.
आर. के. नगरसह पाचगाव परिसरातील अनेक कॉलनींना या टाकीतून पाणी पुरवठा होत आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही नागरिकांना भागातील असंख्य गळतीमुळे मुबलक पाणी मिळत नाही. पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गळतीतून पाणी वाहत असल्याने व रस्त्यावर नेहमी अवजड वाहतूक असल्याने चार महिन्यांपूर्वी केलेला रस्ता खराब होण्याच्या मार्गावर आहे.
‘सकाळ’मधून १४ सप्टेंबरला ''आर. के. नगरात जलवाहिनीला गळती''व १७ १४ सप्टेंबरला''आर.के.नगरात पाणी गळतीचा निषेध''या वृत्तांमधून संबंधित अधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या वृत्तांची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाने सदर गळती काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कोट
संबंधित ठिकाणी ६ इंची लाईनवरील दोन गळती काढून पूर्ण झाल्या आहेत. १० इंची लाईनवरील गळती मुख्य रस्त्यात येत असल्याने वाहतूक वळवून उद्यापर्यत ती गळती काढण्यात येईल.
-प्रिया पाटील, शाखा अभियंता, पाण्याचा खजिना

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01838 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..