जरग विद्यामंदिरच्या पालकांचा बहिस्काराचा इशारा मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरग विद्यामंदिरच्या पालकांचा बहिस्काराचा इशारा मागे
जरग विद्यामंदिरच्या पालकांचा बहिस्काराचा इशारा मागे

जरग विद्यामंदिरच्या पालकांचा बहिस्काराचा इशारा मागे

sakal_logo
By

जरग विद्यामंदिरच्या पालकांचा
बहिष्‍काराचा इशारा मागे
कंदलगाव, ता. ६ ः जरग विद्यामंदिर येथील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अद्यापन करणाऱ्या शिक्षकांची बदली केल्याच्या निषेधार्थ पालकांनी ६ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मंगळवारी (ता. ४) बदली रद्द झाल्याचे पत्र संबंधित शाळेला मिळाल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केल्याचे मुख्याद्यापक सुनील पाटील यांनी सांगितले.
दीड-दोन महिन्यांपासून शिष्यवृत्ती शिक्षिका शैलजा पाटील यांची बदली रद्द करणेसाठी पालक प्रयत्नशील होते. शिष्यवृत्तीची परीक्षा होईपर्यंत शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी मागणी पालकांची होती. मात्र बदलीबाबत महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने जरग विद्यामंदिरच्या पाचवीच्या पालकांनी बहिष्‍काराचा इशारा दिला होता.