फोटो ओळ..कंदलगाव आठवडी बाजाराचे माळवाडी परिसरात स्थलांतर केल्याने झालेली गर्दि. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..कंदलगाव आठवडी बाजाराचे माळवाडी परिसरात स्थलांतर केल्याने झालेली गर्दि.
फोटो ओळ..कंदलगाव आठवडी बाजाराचे माळवाडी परिसरात स्थलांतर केल्याने झालेली गर्दि.

फोटो ओळ..कंदलगाव आठवडी बाजाराचे माळवाडी परिसरात स्थलांतर केल्याने झालेली गर्दि.

sakal_logo
By

03632
कंदलगाव ःयेथील आठवडी बाजाराचे माळवाडी परिसरात स्थलांतर केल्याने झालेली गर्दी.
----------------------

कंदलगाव आठवडी बाजाराचे स्थलांतर
माळवाडी परिसरात भरणार : वाहतूक कोंडीमुळे ग्रामपंचायतीचा निर्णय

कंदलगाव, ता. १३ : स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्न मालाला योग्य भाव व जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी गावात आठवडा बाजार भरविणेचा निर्णय झाला होता. प्रत्येक गुरुवारी हा बाजार भरविण्याचा ठरावही करण्यात आला होता. हा बाजार गाव वेशीत मुख्य रस्त्यावर असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी व इतर वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने स्थानिक नागरिकांचा विचार करून आज (ता. १३) पासून बाजार माळवाडी परिसरात स्थलांतर केल्याने गावातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गावच्या बाजारात हुपरी,कागल,गोकुळ शिरगाव येथून विक्रेते येत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्‍वभूमीवर माळवाडी परिसरातील जागेचे सपाटीकरण करुन विक्रेत्यांना बसण्यासाठी चांगल्या जागेत नेटके नियोजन केले आहे.

कोट..
गाव वेशीत रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी, स्थानिकांची कसरत होत होती. त्यामुळे आठवडी बाजार रिकाम्या ठिकाणी भरविणे गरजेचे होते. सर्वांनुमते बाजाराचे स्थलांतर केले.
- उत्तम पाटील; विद्यमान सदस्य
अशोक मुसळे-ग्रामसेवक.