फोटो ओळ..आर.के.नगर-कंदलगाव मुख्य रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..आर.के.नगर-कंदलगाव मुख्य रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री..
फोटो ओळ..आर.के.नगर-कंदलगाव मुख्य रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री..

फोटो ओळ..आर.के.नगर-कंदलगाव मुख्य रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री..

sakal_logo
By

B03663
कंदलगाव ः आर.के.नगर-कंदलगाव मुख्य रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री.
---------------------------

कंदलगाव परिसरात कुत्र्यांची दहशत
मॉर्निंग वॉकर्सही भीतीच्या छायेत ; बंदोबस्त करण्याची मागणी

कंदलगाव, ता. २१ ः आर. के. नगरपासून कंदलगावपर्यंतचा परिसर माळरानाचा असून या परिसरात स्वच्छ व मोकळे वातावरण आहे. त्यामुळे या रस्त्यावर मॉर्निंग वॉकर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, महिन्याभरापासून परिसरात सुमारे पन्नासहून अधिक कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याने व काही कुत्री हिंसक असल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
आर. के. नगर, भारतमाता कॉलनी, अष्टविनायक पार्क, धन्वंतरी नगर, म्हाडा कॉलनी, प्रथमेश कॉलनी परिसरात ही कुत्री दिवसरात्र हिंडत असतात. काही वेळा लहान मुलांच्या हातातील पिशवी पाहून कुत्री पाठलाग करतात. त्यामुळे पालकांतून भीती व्यक्त होत आहे.

चौकट..
मॉर्निंग वॉकर्स दबकून..
सरावासाठी धावणे, सायकलिंग तसेच शारीरिक लवचिकता वाढविण्यासाठी अनेक विद्यार्थी, भरतीपूर्व सराव करणारे तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक असे असंख्य मॉर्निंग वॉकर्स रस्त्यावर असतात. पळताना किंवा काठी टेकत जाताना हमखास कुत्री मागे लागतात. यामुळे सर्वांनाच व्यायाम या कुत्र्यांना दबकून करावा लागतो.

कोट..
ॲकॅडमीच्या सरावासाठी पहाटे सर्व मुलांना घेऊन रस्त्यावर सराव सुरू असतो.अनेकदा धावताना अचानक कुत्री मागे लागतात. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
- ऋतूराज कदम, बॉक्सिंग प्रशिक्षक

कोट..
कुत्र्यांच्या दहशतीने रस्त्यावर एकट्याने फिरायला जाणे भीतीदायक झाले आहे. रोज सोबतीची वाट बघत थांबून सोबतीला कोण तरी आले की मग फिरायला जावे लागते. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- शरद कांबळे, ज्येष्ठ नागरिक