फोटो ओळ..१)मोरेवाडी कचरा डेपोतून उसळणारे धुराचे लोट.२)कॉलनीत पसलेला धुर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..१)मोरेवाडी कचरा डेपोतून उसळणारे धुराचे लोट.२)कॉलनीत पसलेला धुर.
फोटो ओळ..१)मोरेवाडी कचरा डेपोतून उसळणारे धुराचे लोट.२)कॉलनीत पसलेला धुर.

फोटो ओळ..१)मोरेवाडी कचरा डेपोतून उसळणारे धुराचे लोट.२)कॉलनीत पसलेला धुर.

sakal_logo
By

03686, 03685
मोरेवाडी ः कचरा डेपोतून उसळणारे धुराचे लोट, तर दुसऱ्या छायाचित्रात कॉलनीत पसलेला धूर.


दुर्गंधी, धुराने व्यापला परिसर
आर. के. नगर शेजारच्या कॉलनींचा कोंडला श्‍वास; नागरिकांच्या जीवाशी खेळ

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. १ ः झपाट्याने वाढणाऱ्या रहिवाशी कॉलनी आणि तितक्याच वेगाने जमा होणारा कचरा यामुळे दिवस उगविताच ग्रामपंचायत प्रशासनाची धावाधाव सुरू होते. अन् घंटागाडीतून भारती विद्यापीठ परिसरात कचरा डंपिंग होतो.
येथे जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने दहा वर्षांपासून या परिसरातील नागरिक कचऱ्यातील दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. काही वेळा या ढिगाऱ्यातील कचरा इतरत्र पसरू नये यासाठी तो पेटविला जातो. या पेटत्या ढिगातून धुराचे लोट उसळून शेजारील कॉलनींचा श्वास कोंडला आहे. कोंडाळ्यातील धुरामुळे स्थानिकांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याने हा धूर कधी कमी होणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
पाचगाव पूर्व बाजू व संपूर्ण मोरेवाडी परिसरातून जमा होणारा कचरा भारती विद्यापीठ शेजारील माळावर डंपिंग केला जातो. मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.

चौकट
धुराचे धोके...
- विषारी आणि दुर्गंधीयुक्त वायूची निर्मिती
- पर्यावरणाची हानी, श्‍वसनाचे आजार
- सर्दी, खोकला, डोळ्यांची जळजळ, डोळे येणे
- सतत संपर्काने फुफ्फुसाचे आजार, त्वचा विकार आदी


चौकट...
अशी घ्या काळजी...
- घरातून बाहेर पडताना मास्क वापरा
- लहान मुलांना बाहेर पाठवू नका
- धुराच्या परिसरात फिरणे टाळा
- धुराचा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या

कोट
धुराचे प्रदुषण वाढल्याने श्‍वसनाचे विकार होऊ शकतात. जादा धुराच्या ठिकाणी मास्क वापरावा. लहान बाळ, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डोळे, त्वचा सांभाळा. त्रास होत असल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.
- डॉ. वैशाली वाडकर, होमिओपॅथिक

कोट
गेल्या दहा वर्षांपासून या धुराचा त्रास सहन करीत आहोत. अनेकदा माहिती देऊनही ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावून धूर थांबवावा.
- रंजना बराले, वंदना मेढे, अष्टविनायक पार्क