फोटो ओळ...आर.के.नगर परिसरात फुललेली सप्तपर्णी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ...आर.के.नगर परिसरात फुललेली सप्तपर्णी..
फोटो ओळ...आर.के.नगर परिसरात फुललेली सप्तपर्णी..

फोटो ओळ...आर.के.नगर परिसरात फुललेली सप्तपर्णी..

sakal_logo
By

03698, ०३६९७
कंदलगाव : आर. के. नगर परिसरात फुललेली सप्तपर्णी.
.................

कंदलगाव परिसरात सप्तपर्णीची दरवळ

प्रकाश पाटील / सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव ता. ३ : कोल्हापूर दक्षिणचा परिसर हा निसर्गरम्य व टेकड्यांचा असल्याने या परिसरात येणाऱ्या कंदलगाव,पाचगाव, मोरेवाडी, गिरगाव व कळंबा तलावाच्या परिसरात सप्तपर्णीचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. या परिसरात रात्री सप्तपर्णीच्या फुलांसह रातराणीची दरवळ होत आहे. या परिसरात सॉसेज ट्री, गुलाबी टॅबेबिया, गिरीपुष्प, सप्तपर्णी, पुत्रंजीवा, रातराणी असे वृक्ष आढळतात. सप्तपर्णीचे एक वैशिष्ठ आहे कि त्याची फुले सहजासहजी नजरेत येत नाहीत. मात्र संध्याकाळच्या वेळेत त्याच्या विशिष्ट सुगंधावरून कळते. सध्या थोड्याफार प्रमाणात थंडीचे दिवस सुरु झाल्याने या भागातून सप्तपर्णी, रातराणीची दरवळ अनुभवायला मिळते. पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. या फुलांचा बहर जास्त काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर जोडी -जोडीने वितभर शेंगा लोंबतात. या शेंगा मात्र लक्ष वेधतात.
सप्तपर्णी वृक्ष उष्ण व समशितोष्ण कटीबंधात आढळतो. भारतीय उपखंड, पूर्व आशियात प्रमाण कमी, भारत, जपान, श्रीलंका बांग्लादेश, मलेशिया, ब्रम्हदेश ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया इत्यादी ठिकाणी जंगलात वृक्ष आढळतो. हा वृक्ष ४०ते ६० फुटापर्यंत वाढतो. समुद्रसपाटीपासून १२५० मीटर उंचीपर्यंत वृक्ष आढळतो.


चौकट..
विविध भाषेतील नावे.
मराठी-सातवीण,सप्तपर्णी.
संस्कृत-सप्तपर्णी,सप्तच्छद.
हिंदी-सातविण,सतिआन.
गुजराथी-सातवण.
कानडी-हाले,कडूसले.
तामिळ-एळिलाप्पाले.
पश्चिम बंगालमध्ये या वृक्षाला''राज्यवृक्ष''मानला जातो.

चौकट
बहुपयोगी सप्तपर्णी
वृक्ष दिसायला सुंदर असल्याने उद्याने, बागा रस्त्याच्या दुतर्फा, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये या परिसरात लावतात. पेपर निर्मिती, खोकी, आगकाडया, पेटी, शाळेच्या पाट्या, पेन्सील तसेच खोडातील चीक, साल, पाने विविध रोग, व्याधी बऱ्या करणेसाठी वापरतात. आयुर्वेदात पंचकर्म शुध्दीसाठी साल वापरतात. या वृक्षाला''इंडियन सिंकोना'' नावानेही ओळखतात.