बाल अधिकार दिन सप्ताहाचे अवनितर्फे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल अधिकार दिन सप्ताहाचे
अवनितर्फे आयोजन
बाल अधिकार दिन सप्ताहाचे अवनितर्फे आयोजन

बाल अधिकार दिन सप्ताहाचे अवनितर्फे आयोजन

sakal_logo
By

बाल अधिकार दिन सप्ताहाचे
अवनितर्फे आयोजन
कळंबा, ता. १५ ः अवनि संस्थेतर्फे १४ ते २० नोव्हेंबर बाल दिन व बाल अधिकार दिवस या सप्ताहामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. या मध्ये मुलींचे बालगृह या अंतर्गत बालगृहांना अनुदान मिळावे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच मुलांच्या सहभागातून शंभर पोस्ट कार्डद्वारे बालसंगोपन या योजनेची व्याप्ती वाढवून देण्यात यावी, अशी राज्यव्यापी मागणी महिला व बालकल्याण राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उड्डाण प्रकल्पा अंतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यामध्ये बालकामगार व बालविक्षेकरी मुक्तता करिता धाडसत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. वीटभट्टी व साखरशाळा डे केअर सेंटर उपक्रमाअंतर्गत हंगामी बालकासाठी मूळ गावी वस्तीग्रहाची सोय करण्यात यावी. याबाबत बालकांच्या सहभागातून सामाजिक न्याय मंत्री यांना शंभर पोस्ट कार्डद्वारे मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार व बालकांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणेबाबत साखर संचालक यांना निवेदन देण्यात येणार आहे. अभ्यासिका प्रकल्प अंतर्गत किशोरवयीन मुला-मुलींचा परिसंवाद, आरोग्य शिबिरे, सहल व शिष्यवृत्ती संदर्भात सामाजिक न्याय मंत्री यांना शंभर पोस्ट कार्डद्वारे निवेदन पाठविण्यात येणार आहे. लिंगभाव समानता उपक्रमाअंतर्गत लिंगभाव समानता हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात यावा. या संदर्भात शिक्षण मंत्री यांना शंभर पोस्ट कार्डद्वारे मागणी करण्यात येणार आहे. बालअधिकार मंचअंतर्गत बाल अधिकार याविषयी परिसंवाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यामध्ये होणार आहे, अशी माहिती अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी दिली आहे.