फोटो ओळ..गिरगाव येथे ग्रासकटरने भात करताना शेतकरी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..गिरगाव येथे ग्रासकटरने भात करताना शेतकरी.
फोटो ओळ..गिरगाव येथे ग्रासकटरने भात करताना शेतकरी.

फोटो ओळ..गिरगाव येथे ग्रासकटरने भात करताना शेतकरी.

sakal_logo
By

०३७४५
गिरगाव ः येथे ग्रासकटरने भात करताना शेतकरी.
-----------------
ग्रासकटरच्या मदतीने
शेतमजुरीवर मात

गिरगावच्या संभाजी साळोखेंचा उपक्रम;

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव ता. १३ ः आधुनिक शेतीचा वारसा जपत शेतीत प्रगती होत असली तरी भांगलण, टोकणणी शेतमजुरांद्वारे होणारी प्रकिया आहे. पाश्चात्य देशाच्या मानाने थोडीफार प्रगती होत असली तरी आपल्याकडे अखंड शेती नसल्याने बांधांचा येणारा अडसर आधुनिक यंत्रांना बाधा ठरत आहे. आपल्याकडील बांध संस्कृतीमुळे मोठ्या यंत्राचा वापर कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच शेतमजुरांची आवश्यकता भासते. मात्र, गिरगावच्या संभाजी साळोखे यांनी ग्रासकटरचा वापर करून कमी खर्चात भात कापणी साधली आहे. ग्रासकटरमुळे कापणीसाठी लागणारा वेळ वाचलाच. शिवाय चार मजुरांचा खर्चही वाचून वेळेत भातकापणी पूर्ण झाली.

चौकट..
शेतमजूर टंचाई
दहा-बारा वर्षांपासून शेतीत वाढलेली आधुनिकता काही अंशी घातक ठरली असून यांत्रीकीचा वापर वाढल्याने शेतमुरांची टंचाई भासते. अशावेळी पुन्हा यंत्राच्या सहाय्याने शेतकरी शेतमजूरांची कमतरता भरून काढत आहे.

कोट..
वेळी-अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेती उत्पादन वेळेत घरी आणणे महत्वाचे आहे. अशावेळी शेतमजुरांची टंचाई काळजीचा विषय ठरत आहे. ग्रासकटरसारख्या यंत्रामुळे चार ते पाच मजुरांचे काम एकटा माणूस करू शकतो. वेळही वाचत आहे.
- संभाजी साळोखे, शेतकरी