जागतिक वारसा सप्ताह आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक वारसा सप्ताह आजपासून
जागतिक वारसा सप्ताह आजपासून

जागतिक वारसा सप्ताह आजपासून

sakal_logo
By

जागतिक वारसा सप्ताह आजपासून
कंदलगाव, ता. १८ : पुरातत्त्‍व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कोल्हापूर वस्तुसंग्रहालय आणि यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन कोल्हापूर यांच्यतर्फे १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यात वेशभूषा भूमिका सादरीकरण, निबंध लेखन, हेरिटेज वास्तू प्रत्यक्ष चित्र रेखाटन अशा स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्या स्पर्धकांना पुरातत्त्‍व विभागातर्फे पारितोषिक व प्रशस्‍तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सदरच्या स्पर्धा या नूतन मराठी विद्यालय हायस्कूल, मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येथे होणार आहेत. जागतिक वारसा सप्ताहनिमित्त आयोजित केलेल्या या विविध स्पर्धेमध्ये कोल्हापूर शहरातील शाळा व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, उत्तम कांबळे, राहुल चौधरी, सचिन जाधव, संदीप जाधव आदींनी केले.