फोटो..स्वरा जाधव.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो..स्वरा जाधव..
फोटो..स्वरा जाधव..

फोटो..स्वरा जाधव..

sakal_logo
By

०३८१०
स्वरा जाधव

स्वराने सोशल मीडियातून जागविला इतिहास
कंदलगाव; ता. २४ ः महाराष्ट्र हायस्कूलमध्ये ५ वीत शिकणारी ११ वर्षाची स्वरा जाधव रोज न चुकता सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय, संभाजीराजांचे ऐतिहासिक दिनविशेष सांगून इतिहासाला उजाळा देत आहे.
तिने ८५ ठिकाणी कथाकथन, भाषण, व्याख्यानाद्वारे इतिहासाला उजाळा दिला आहे. पन्हाळ्यात संयुक्त शिवजयंतीवेळी शिवव्याख्यान, गडकिल्ले पदभ्रमंती, गडांची माहिती, पन्हाळा ते पावनखिंड ६५ कि.मी.ची पदभ्रमंती, पावनखिंडीचा रणसंग्राम विषयावर व्याख्यान यासह अनेक उपक्रम केले आहेत. स्वराला आई-वडिलांसह ऋतुराज कदम, नितीन बानुगडे, अन्सार शेख, नीलेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. स्वरा कपिलतीर्थमध्ये शिशू विद्याविहारमध्ये शिकताना शिक्षिका छाया चव्हाण यांनी तिची आवड ओळखून इतिहासाचे संस्कार केले. तिला जिमनॅस्टिक, भरतनाट्यम्, गरजूंना अन्नदान, शालेय साहित्य वाटप उपक्रमांत सहकार्य करते. याबाबत आई गायत्री जाधव म्हणाल्या, ‘वाचन, लेखन, गडकिल्ले संवर्धन, स्वच्छतेबरोबर शिकून तिला आयएएस व्हायचे आहे.

कोट..
छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, बाजीप्रभूंच्या गोष्टी, पुस्तके तिला आवडतात. पदभ्रमंतीसाठी ती उत्सुक असते.
ऋतूराज कदम, बॉक्सिंग प्रशिक्षक