मोरेवाडीला दोन पाणी टाक्या मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरेवाडीला दोन पाणी टाक्या मंजूर
मोरेवाडीला दोन पाणी टाक्या मंजूर

मोरेवाडीला दोन पाणी टाक्या मंजूर

sakal_logo
By

मोरेवाडीला दोन पाणी टाक्या मंजूर
जलजीवन अंतर्गत लाभ; जागा उपलब्धीसाठी पत्रव्यवहार
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ५ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग क्र. १ यांचेकडून जलजीवनमिशन कार्यक्रमातंर्गत गांधीनगर सुधार प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून गणेश टेकडी व हनुमान टेकडी येथे अनुक्रमे आठ लाख व पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन पाणी टाक्या मंजूर झाल्या आहेत. यामुळे मोरेवाडीसह परिसराला मुबलक पाणी मिळणार आहे.
गणेश टेकडी व हनुमान टेकडी येथे जागा उपलब्ध करून देणेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून टाकीबाबत ना हरकत मागविली आहे. अनेक दशकांपासून मोरेवाडी व परिसरासाठी गांधीनगर योजनेतून होणारा पाणीपुरवठा गळतीमुळे नेहमीच कमी दाबाने होतो. वैभव सोसायटी टाकीतून होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर असल्याने शांतिनिकेतन शाळा व परिसरात नेहमीच गळतीची समस्या होती. आता थेट गणेश टेकडी टाकी व हनुमान टेकडी टाकीत साठा होणार असल्याने पुढील काळात गळतीमुळे होणारी पाण्याची हानी कमी होऊन मोरेवाडी परिसराला मुबलक पाणी मिळणार आहे.
---------------
कोट
मोरेवाडीला पाणी साठवण्यासाठी पुरेशा टाक्या नव्हत्या. आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गावासाठी दोन टाक्या मंजूर झाल्याने पुढील काळात पाणीटंचाई भासणार नाही.
- अमर मोरे, विद्यमान सदस्य, माजी सरपंच
-------------
कोट
जलजीवन मिशनची वर्क ऑर्डर झाली आहे. पुढील काळात होणाऱ्या नवीन कामामध्ये सर्व पाईपलाईन बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही. सर्व विभागांना मुबलक पाणी मिळेल.
- अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण