Thur, Feb 9, 2023

प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.. अभिनेते- मिलींद सोमण.
प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.. अभिनेते- मिलींद सोमण.
Published on : 21 December 2022, 2:25 am
03970
कोल्हापूर ः बँक ऑफ बडोदा आयोजित ग्रीन राईड २.० कार्यक्रमात बोलताना अभिनेते मिलिंद सोमण. शेजारी क्षेत्रीय प्रमुख प्रशांत आव्हाड व इतर मान्यवर.
प्रदूषण कमी करण्यासाठी
प्रयत्न करावेत ः मिलिंद सोमण
कोल्हापूर, ता. २१ ः प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अभिनेते मिलिंद सोमण यांनी केले. बँक ऑफ बडोदातर्फे ग्रीन राईड २.० च्या अंतर्गत येथील क्षेत्रीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बँक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय प्रमुख प्रशांत आव्हाड प्रमुख उपस्थित होते.
आव्हाड यांनी या उपक्रमाविषयी माहिती देऊन वृक्षरोपांचे वाटप केले. उपक्षेत्रीय प्रमुख देवीदास पालवे, क्षेत्रीय व्यवसाय विकास प्रबंधक मोहसीनखान शेख, सहाय्यक महाप्रबंधक सचिन देशमुख, जी. विजयालक्ष्मी यांची उपस्थिती होती.