
कंदलगाव.आरटीओ सर्कलमध्ये सुविधांची वाणवा.. स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर विधी..
04005
मोरेवाडी ः येथील असुविधांच्या गर्तेत असणारे आरटीओ सर्कल.
आरटीओ सर्कलमध्ये सुविधांची वाणवा
चालक, वाहकांत नाराजी; तपासणीसाठी शुल्कातून कोठ्यवधीचा महसूल शासनाकडे जम;
प्रकाश पाटीलः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २६ ः वाहनांची वाढती संख्या, वाहन तपासणीसाठी दिवसभर रांगा, रोजची गर्दी आणि यामुळे होणारी वाहतूक कोंडी, जिल्ह्यातून येणाऱ्या अवजड वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रादेशिक वाहन तपासणीसाठी प्रशासनाने मोरेवाडी हद्दीतील भारती विद्यापीठ परिसरात आरटीओ सर्कलची स्थापना केली. शहरात होणारी गर्दी, वाहतूक कोंडी कमी केली. मात्र तेथे प्राथमिक सुविधांची वाणवा आहे.
येथे येणाऱ्या ट्रक, बस, एसटी, टेम्पो, रिक्षा या प्रत्येक वाहनांची कायदेशीर बाबी तपासून तपासणी करून ती वाहतुकीस तंदुरुस्त असल्याचा दाखला दिला जातो. या तपासणीसाठी शुल्क स्वरूपात घेतली जाणारी रक्कम अवजड व मोठी वाहने ८०० व इतर वाहनांसाठी ६०० रूपये आहे. दररोज सुमारे १०० वाहनांची तपसणी होत असल्याने मागील चार वर्षाचा विचार केला तर यातून कोठ्यवधीचा महसूल शासनाकडे जमा झाला आहे. मात्र, काही हजारात तयार होणारे स्वच्छतागृह व त्याचबरोबर मिळणाऱ्या प्राथमिक सुविधांच्या प्रतीक्षेत वाहन धारकांना आडोसा शोधून आपल्या विधी पूर्ण कराव्या लागतात.
संबधित कार्यालयाकडून आपल्या सोयीसाठी टेस्टींग ट्रॅक व इतर सुविधा केल्या. मात्र तपासणीसाठी येणाऱ्या चालक, वाहकसांठी सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
चौकट
तपासणी ट्रॅक सुस्थितीत..
शहरात गर्दी होत असल्याने तपासणी ट्रॅक मोरेवाडीच्या हद्दीत सुरू केला. मात्र, ट्रॅक सोडला तर इतर कोणत्याही सुविधा या ठिकाणी नाहीत.
चौकट
दृष्टिक्षेपात..
*रोज येणारी वाहने
-रिक्षा २० ते २५, तपासणी वेळ -सकाळी,
-इतर वाहने ( ट्रक, बस, अवजड, टेम्पों इ. ) संख्या ४० ते ५०
*ट्रॅकवर अंधाराचे साम्राज्य
* परिसरात मद्यपींचा वावर
* स्वच्छतागृहांचा अभाव
* खाचखळग्यांचा रस्ता.
कोट
तीन वर्षापासून या परिसरात वाहनधारकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा शा सुविधा नसल्याने दिवसभर ताटकळत उभे रहावे लागते.
-संतोष रणदिवे, नागरिक
कोट
या ठिकाणी फिटनेस ट्रॅक असल्याने सिझनवार वाहनांची संख्या कमी जास्त होत असते. या सर्वांसाठी सुसज्य स्वच्छतागृह, कॅटींगची, विश्रामगृहाची मागणी केली आहे. पुढील वर्षात येथे सर्व सोयी मिळतील. आमच्या कार्यालयाकडूनही वारंवार पाठपुरावा सुरू आहे.
-रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ, कोल्हापूर