कंदलगाव..शरीराला आवश्यक घटक पुरविणाऱ्या चिंचेची झाडे लुप्त होणाच्या मार्गावर..लागवड, संगोपनाची गरज.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंदलगाव..शरीराला आवश्यक घटक पुरविणाऱ्या चिंचेची झाडे लुप्त होणाच्या मार्गावर..लागवड, संगोपनाची गरज..
कंदलगाव..शरीराला आवश्यक घटक पुरविणाऱ्या चिंचेची झाडे लुप्त होणाच्या मार्गावर..लागवड, संगोपनाची गरज..

कंदलगाव..शरीराला आवश्यक घटक पुरविणाऱ्या चिंचेची झाडे लुप्त होणाच्या मार्गावर..लागवड, संगोपनाची गरज..

sakal_logo
By

04023, 04024
पाचगाव ः येथील माळवाडी येथे असलेले जुनाट चिंचेचे झाड..
------------

चिंचेची झाडे लुप्त होणाच्या मार्गावर
लोह, कॅल्शियमसाठी उपयुक्त; लागवड, संगोपनाची गरज

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २९ ः सदाहरित वृक्ष म्हटले की नजरेत चिंचेचे झाड येते. त्यात चिखट, मीठ लावलेली गाभूळलेली चिंच पाहिली की मनसुद्धा आवरत नाही. अशा आंबट-गोड चिंचेचा वापर चटणी, सॉस, डाळ वरण, मिठाई बनविताना केला जातो. दैनंदिन खाद्य पदार्थांत चिंचेचा वापर केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र आलीकडे पंधरा-वीस वर्षांत वृक्षाच्या लागवड, संगोपनाकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याकडेला रांगेत असलेले हे वृक्ष लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. चिंचेचे पौष्टिक घटक आरोग्याच्या समस्यांपासून संरक्षण करतात. लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यामुळे शरीराला उपयोगी असणाऱ्या चिंचेची लागवड, संगोपन होणे गरजेचे आहे.

चौकट -
उपयोग..
- पानाच्या रसाचा उपयोगाने
स्तनदा मातांच्या दुधातील पोषणमूल्ये वाढतात.
- पानांचा उपयोग पचनास मदत करतो.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- पानांचा रस लिंबाच्या रसासोबत कफावर गुणकारी
- त्वचारोगावर पाला उपयुक्त
- पाने चावून खाल्ल्यास दुर्गंधी नाहीशी होते.

चौकट- लागवड..
चिंचोके किंवा त्याच्या कलमापासून वृक्षलागवड करता येते. एक फूट बाय एक फुटाचा खड्डा खणून शेणखत, मातीचे मिश्रण करून रोप लावावे. या रोपांना कोणतीही जमीन चालते. वृक्षाला ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये चिंचा लागतात.

कोट..
चिंचेत लोह असल्याने ती योग्य प्रमाणात सेवन केल्यास शक्ती वाढते. शरीरातील चरबी, साखरेचे प्रमाण, रक्तदाबसह पोटाशी संबंधित विकार दूर होतात. इतका उपयोग असूनही शासनाचे वृक्षाकडे दुर्लक्ष झाले आहे. चिंच, लिंब या भारतीय वंशाच्या वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
- मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ज्ञ