सुधारीत बातमी... सुभाष नगर पंपिंगचा उपसा बंद .. पंप पुन्हा नादुरुस्त.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारीत बातमी... सुभाष नगर पंपिंगचा उपसा बंद .. पंप पुन्हा नादुरुस्त..
सुधारीत बातमी... सुभाष नगर पंपिंगचा उपसा बंद .. पंप पुन्हा नादुरुस्त..

सुधारीत बातमी... सुभाष नगर पंपिंगचा उपसा बंद .. पंप पुन्हा नादुरुस्त..

sakal_logo
By

04138
कंदलगाव : सुभाषनगर पंपिंगमधील बंद पडलेला पंप.
................

सुभाषनगर पंपिंगचा उपसा बंद

पंप पुन्हा नादुरुस्त; पाण्यासाठी वणवण थांबणार कधी?

कंदलगाव, ता. १० ः दहा दिवसांपूर्वी दुरुस्त करून आणलेला सुभाषनगर येथील पंप बंद पडल्याने आर. के. नगर, पाचगाव परिसरातील कॉलन्यांचा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला.
१५ डिसेंबरपासून सुभाषनगर पंपिंग मधून होणारा पाणीपुरवठा पंप नादुरुस्त असल्याने बंद होता. पाचगाव, आर. के. नगर परिसरातील ज्या कॉलन्यांना या पंपिंगमधून पाणी मिळत होते, त्या कॉलन्यांचा संपूर्ण पुरवठा बंद झाल्याने नागरिकांसह महिलांनी पाण्याची वाट बघून शेवटी पंपिंगला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. तरी पाणीपुरवठा न झाल्याने २९ डिसेंबरला टाळे ठोकण्यासाठी आलेल्या नागरिकांना जलअभियंता व पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून दोन दिवसांत पाणी येणार, असे आश्वासन दिले व आंदोलनकर्त्यांना परत पाठवले. आंदोलनकर्ते पाणी पुन्हा मिळणार, या आशेने परत फिरले; मात्र पुढचे दोन दिवस पुन्हा पाणी मिळाले नाही. पंप दुरुस्त करून आणल्यानंतर थोड्या प्रमाणावर पाणी मिळाले ते आजअखेर सुरळीत झालेले नसताना आज पुन्हा सुभाषनगर पंपिंगचा उपसा पंप बंद पडल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. पाणीपुरवठा करणारा पंप एकच असल्याने या परिसरात नेहमीच पाण्यासाठी वणवण होत आहे.

चौकट..
आमदारांची भेट अन्‌...
कालच आमदार ऋतुराज पाटील यांनी पंपिंगला भेट देऊन परिस्थिती जाणली होती. त्यावेळी बदली पंप त्वरित लावण्याचे आदेश देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले होते. पाण्यासाठी दिवस खर्च करणाऱ्या महिलांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती होणार असल्याने हा वनवास संपणार तरी कधी, या प्रश्नाने जीव टांगणीला लागला आहे.

कोट..
अनेकदा पाणी येत नसल्याने टँकरची मागणी केली; मात्र ग्रामीण भागात टँकर देत नसल्याचे सांगण्यात येते. पाण्यासाठी उठल्यापासून रात्रीपर्यंत भटकंती होते. लोकप्रतिनिधी , प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे.
श्रीधर वष्ट, नागरिक

कोट..
पंप बंद पडल्याचे समजले. नवीन बदली पंपाच्या प्रयत्नात आहोत. तो येईपर्यंत हा पंप त्वरित सुरू करून पाणीपुरवठा सुरू करू.
- हर्षजित घाटगे, जलअभियंता