
कोल्हापूर..दृष्टी नसली तरी चालेल पण दृष्टिकोन चांगला हवा.. पल्लवी कदम
04270
दृष्टी नसली तरी चालेल,
दृष्टिकोन चांगला हवा
पल्लवी कदम : दृष्टीबांधवांसाठी कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ४ : नवनवीन उपक्रमामुळे उच्च अभ्यासाचे साधन तयार झाले आहे. शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाणे गरजेचे आहे. त्यावेळी दृष्टी नसली तरी चालेल, पण दृष्टिकोन चांगला हवा, असे प्रतिपादन मुंबईतील नॅबच्या संचालिका पल्लवी कदम यांनी केले. त्या येथे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) तर्फे आयोजित दृष्टीबांधवांसाठी कार्यशाळेत बोलत होत्या.
यावेळी राम विचारे व संगीता विचारे दाम्पंत्याच्या हस्ते दृष्टीहिन बांधवांना साहित्य वाटप झाले. कदम म्हणाल्या, ‘दृष्टीबाधितांचे पुनर्वसन होण्यासाठी शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे. बाधितांनी ऑनलाईनपेक्षा प्रात्यक्षिकांना महत्त्व द्यावे. नॅब ७२ वर्षांपासून नर्सरी ते वृध्दाश्रमापर्यंत कार्य करीत आहे. ब्रेन लिपीचा वापर करीत शिक्षण घेऊन बाधित उच्चपदावर नोकरी करू शकतो. बालपणापासून अंधत्व असेल तर बोटांच्या स्पर्शातून शिक्षणाची प्रगती कशी साधावी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विजय रेळेकर , डॉ. मुरलीधर डोंगरे , जयश्री ठाकूर, डॉ.मीना डोंगरे , राम विचारे , संगीता विचारे, ज्योति सावंत यांचे सह दृष्टीबाधित व त्यांचे पालक उपस्थित होते.
दृष्टिक्षेपातील मार्गदर्शन..
अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचाही विचार व्हावा.
आधुनिक काळातील बदलाप्रमाणे अभ्यास करावा.
व्यक्तीचे पुनर्वसन करताना योग्य बाबी तपासले पाहिजे.
दृष्टीहीन बांधवांना कृतीतून जास्त ज्ञान येते.