कामगार आयुक्तालयावर मोर्चा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार आयुक्तालयावर मोर्चा...
कामगार आयुक्तालयावर मोर्चा...

कामगार आयुक्तालयावर मोर्चा...

sakal_logo
By

04394
कोल्हापूरः महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
....

कामगार आयुक्त कार्यालयावर
सुरक्षा रक्षकांचा मोर्चा

कोल्हापूर, ता. २७ ः प्रलंबित वेतनवाढ करार त्वरित करावा, कपात केलेली आयकर रक्कम परत मिळावी, यांसह विविध मागण्यांसाठी आज भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला.
यावेळी संघटनेच्या वतीने शामराव पुरीबुवा यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सचिव प्रवीण जाधव म्हणाले, ‘‘वाढलेली महागाई बघता जर सहा सात महिने पगार मिळाला नाही. तर घर कसे चालवायचे हा जटिल प्रश्न सुरक्षा रक्षकांपुढे पडला आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे काम करीत असलेल्या सुरक्षारक्षकांचे मागील सहा महिन्यांचे थकीत वेतन त्वरित मिळावे.’’ या वेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील, प्रदेश अध्यक्षा अनुजा धरणगावकर, प्रदेशाध्यक्ष संदीप पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी चौगुले, दादासो खेत्राप्पा, राजकुमार पाटील यांच्यासह सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
दरम्यान, सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने १० दिवसांपूर्वी सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना मोर्चा असल्याची पूर्वकल्पना देऊनही ते गैरहजर होते. याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
..