कंदलगाव..पाचगाव शिक्षक कॉलनीत घराचे कडीकोयंडा तोडून रोख रक्कमेसह चांदीचे दागीने लंपास.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंदलगाव..पाचगाव शिक्षक कॉलनीत घराचे कडीकोयंडा तोडून रोख रक्कमेसह चांदीचे दागीने लंपास..
कंदलगाव..पाचगाव शिक्षक कॉलनीत घराचे कडीकोयंडा तोडून रोख रक्कमेसह चांदीचे दागीने लंपास..

कंदलगाव..पाचगाव शिक्षक कॉलनीत घराचे कडीकोयंडा तोडून रोख रक्कमेसह चांदीचे दागीने लंपास..

sakal_logo
By

04465

पाचगावः शिक्षक कॉलनी येथे चोरट्याने विस्कटलेले कपाटातील साहित्य.
..

पाचगावमधील शिक्षक कॉलनीत चोरी
...

कंदलगाव, ता. ७ः पाचगाव शिक्षक कॉलनी येथील बंद घराचा कडीकोयंडा उचकटून रोख पंचवीस हजार रुपयांसह चोरट्यांनी चांदीचे दागिने लंपास केले.
शिक्षक कॉलनी येथील महादेव भीमगोंडा पाटील हे शुक्रवारी (ता.३)कुटुंबासह परगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी सोमवारी रात्री त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील तीन कपाटे फोडून त्यातील रोख पंचवीस हजार रुपये व लोखंडी कपाटातील गणपतीचे चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी पहाटे महादेव पाटील घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी या घटनेची करवीर पोलिसांत माहिती दिली .