कोल्हापूर. .आंबेडकरी चळवळीतील ५० वर्षाच्या योगदानाबद्दल आर. बी. कोसंबी यांचा गौरव ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर. .आंबेडकरी चळवळीतील ५० वर्षाच्या योगदानाबद्दल आर. बी. कोसंबी यांचा गौरव ...
कोल्हापूर. .आंबेडकरी चळवळीतील ५० वर्षाच्या योगदानाबद्दल आर. बी. कोसंबी यांचा गौरव ...

कोल्हापूर. .आंबेडकरी चळवळीतील ५० वर्षाच्या योगदानाबद्दल आर. बी. कोसंबी यांचा गौरव ...

sakal_logo
By

आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल
आर. बी. कोसंबी यांचा रविवारी गौरव

कोल्हापूर ता. १६ ः सम्यक कृतज्ञता सत्कार समितीच्या वतीने वंचित घटकांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी आंबेडकरी चळवळीत ५० वर्षे काम केलेले लढवय्ये नेते आर. बी. कोसंबी आणि त्यांना सहकार्य केलेल्या सहकाऱ्यांचा गौरव रविवारी (ता. १९) शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी चळवळीतील प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते होत आहे.
कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे उपस्थित राहणार असून, आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक व विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे प्रमुख मार्गदर्शक आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सम्यक कृतज्ञता सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शासन, प्रशासन व पोलिस यांच्याशी समन्वयाची भूमिका साधून गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम कोसंबी यांनी केले आहे. १९७२ पासून ते आजपर्यंत गेली ५० वर्षे ते आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांच्या सोबत त्यांच्या सहकाऱ्यांचाही सन्मान व्हावा, या उद्देशाने आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व प्रा. कवाडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी बहुजन चळवळीतील सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, नेते तसेच फुले, शाहू, आंबेडकरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. पत्रकार परिषदेस विद्याधर कांबळे, रतन कांबळे, संतोष कांबळे, जिनेंद्र कांबळे, अरविंद कुरणे, सुभाष देसाई उपस्थित होते.
...........................