चित्रनगरी रस्त्यावरील खड्डे प्रवाशांच्या जीवावर

चित्रनगरी रस्त्यावरील खड्डे प्रवाशांच्या जीवावर

04555, 04556
कंदलगाव : चित्रनगरी रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे. (छायाचित्र : प्रकाश पाटील)

चित्रनगरी रस्त्यावरील खड्डे
प्रवाशांच्या जीवावर
रात्री अपघात वाढले; डागडूजीही अर्धवट स्थितीत
कंदलगाव ता. २८ : महामार्ग, एमआयडीसी, गोकुळ दूध संघ व कर्नाटकात जाण्यासाठी चित्रनगरी रस्ता सोयीचा असल्याने कोल्हापूर शहर व पश्चिम भागातील प्रवासी, कामगार या रस्त्याचा उपयोग करतात. मात्र सात वर्षापासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून हे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. कंदलगाव कमानीपासून चित्रनगरी टाकीपर्यंत असणारे खड्डे आकाराने मोठे असल्याने या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेकदा अपघात घडत आहेत. दीड दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याची डागडूजी झाली मात्र तीही अर्धवट झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्यासाठी कंदलगाव येथील समाजवेद दक्षता फाउंडेशनकडून अनोखे आंदोलन करून मोठ्या खड्डयांचे श्राद्ध घातले होते. चित्रनगरी रस्ता हा एमआयडीसीसाठी जवळचा असल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावर कोल्हापूरहून व कर्नाटकमधून येणारी वाहने, दूध वाहतूक, विद्यार्थी वाहतूक वाढल्याने रस्त्यावरील खड्डयांची करावी, अशी मागणी होत आहे.
-----------------
चौकट
रस्त्यावर कायम वर्दळ
या रस्त्यावर दोन उच्च महाविद्यालय, आरटीओ सर्कल व दोन माध्यमिक शाळा असून हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. अशावेळी अनेक विद्यार्थी, कामगार कामावर लवकर पोहोचण्यासाठी भरदाव वेगाने जातात. रस्त्यावरील खड्डयामुंळे मात्र अपघात वाढत आहेत.
------------
कोट
संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले असून सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवासी व पादचाऱ्यांना धोका आहे. या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहनधारकांचा प्रवास सुरू आहे. त्वरित या रस्त्याची डागडूजी करावी.
- संग्राम पाटील, सदस्य, ग्रामपंचायत, कंदलगाववव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com