पावसाळ्यातील समस्यांमुळे स्थानिकांची कसरत

पावसाळ्यातील समस्यांमुळे स्थानिकांची कसरत

04558
कोल्हापूर : धुळीने माखलेले बोंद्रेनगरमधील कॉलनीअंतर्गत कच्चे रस्ते.

समस्यांच्या गर्तेत
बोंद्रेनगर : भाग - ४


पावसाळा जवळ येताच नागरिकांच्या अंगावर काटा!
कॉलनीअंतर्गत सर्व रस्ते कच्चे; नगरसेवक, महापालिकेकडून दखल नाही
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : प्रभाग क्रमांक ७३ मधील फुलेवाडी रिंगरोड या प्रभागात एकूण १६ कॉलन्या असून उंच, सखल व शेतवडीचा भाग असल्याने अनेक भागांत पाणी तुंबल्याने स्थानिकांना कसरत करावी लागते. त्यामुळे पावसाळा जवळ येताच नागरिकांच्या अंगावर काटा येतो. या परिसरात कॉलनीअंतर्गत सर्व ठिकाणी कच्चे रस्ते असून एकही रस्ता डांबरीकरण झालेला नाही. अनेक वर्षांपासून नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्याकडे मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बोंद्रेनगर हद्दीतील गडकरी कॉलनी, जांभळे कॉलनी, धनगर वसाहत, दत्त कॉलनी, कोतवाल नगर, शिवशक्ती नगर, शाहू चौक, गजानन कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, संतसेना नगर, राजे संभाजीनगर, हरिप्रियानगर, ग्रामसेवक कॉलनी, मातंग वसाहत, सद्‍गुरू कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, बाळासाहेब इंगवलेनगर, तामजाई धनगर वसाहत यांपैकी अनेक कॉलनीत ड्रेनेज, गटारे, रस्ते, वीज नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य बिघडते.
------------------
चौकट
बारा महिने दुर्गंधी
नियोजनशून्य प्लॉटींगमुळे काही भागांत सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. बारा महिने दुर्गंधीत दिवस काढावे लागतात. अनेकदा या कामांचे आश्‍वासन देऊन मत मागितले जाते, मात्र प्रश्‍नांची सोडवणूक होत नाही.
-----------------
प्रमुख मागण्या
ओपन जिमची गरज
रुग्णालय होणे आवश्‍यक
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
सामाजिक हॉलची बांधणी
रिंग रोडवरील गळती काढावी
रस्ते होणे गरजेचे
खेळाचे मैदान आवश्‍यक
प्रभाग क्रमांक ७३, ८० व ८१ प्रभागाच्या पश्‍चिमेस ड्रेनेज व्हावे
-------------
कोट
मुख्य रस्त्यापासून कॉलनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. ड्रेनेजचा प्रश्न कायम आहे. स्वखर्चाने पाईपलाईन टाकून पाणी आणलेले आहे. पावसाळ्यात कॉलनीत जाणेही मुश्किल होते. आयुक्तांच्याकडे पाठपुरावा केला; पण अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
- अलका देसाई, संतसेना कॉलनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com