कंदलगाव तलावातील 
पाणीसाठ्यात घट

कंदलगाव तलावातील पाणीसाठ्यात घट

04561
कंदलगाव : येथील तलावातील पाणी साठा.

कंदलगाव तलावातील
पाणी साठ्यात घट
पाणी काटकसरीने वापरण्याची गरज
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २६ : गतवर्षी बऱ्यापैकी पर्जन्यमान झाल्याने बहुतांश कंदलगाव तलाव शंभर टक्के भरला. या पाण्याचा वापर वाढल्याने मार्च महिन्यातच पाणी साठा ५० टक्क्यावर आला आहे. त्यामुळे पुढील अडीच महिने उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.
फेब्रुवारीनंतर होणाऱ्या वळीव पावसाने मार्च संपत आला तरी हजेरी लावली नसल्याने उन्हामुळे शेतीसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. अजूनही कंदलगाव परिसरात ठिबक सिंचनचा म्हणावा तितका वापर होत नसल्याने गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर शेतीसाठी सुरू आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात तलावात असणाऱ्या पाणीसाठापेक्षा या वर्षी सुमारे दहा टक्क्यांनी पाणी पातळी खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित साठा काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.
कंदलगाव तलावात सध्याची पाणी पातळी ४०.३० मीटर असून हा पाणी साठा ०.५७ द.ल.घ.मी. म्हणजे ३३.८ टक्के इतका आहे. गेल्या अनेक वर्षापासून तलावातून गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याने शेतीसाठी पाणी वापरात काटकसर करणे गरजेचे होत आहे.
--------------
चौकट
उन्हामुळे वापर वाढला
तलावातून कंदलगाव व गोकुळ शिरगाव येथील एकूण १३८४ एकर क्षेत्रासाठी पाण्याचा वापर केला जातो. सध्या या क्षेत्रामध्ये ऊस व रब्बी पिकामुळे अजूनही वापर सुरू आहे. परिसरात बहुतांश शेती माळरानाची असल्याने उन्हामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.
------------
कोट
जानेवारीनंतरच उन्हाची चटके जाणवू लागले आहेत. मार्च महिन्यात शेतातील पीक वाचवण्यासाठी पाण्याचा वापर जास्त होत आहे. पिके वाचविण्याबरोबर पाणी बचत ही गरजेचे आहे.
- अशोक पुंदिकर, अध्यक्ष, समाजवेध दक्षता फाउंडेशन
------------
कोट
उन्हामुळे तलावातील पाणी उपशाचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर ते जानेवारीच्या कालावधीत थंडीमुळे जास्त उपसा झाला नाही. मात्र फेब्रुवारीमध्ये त्याचे प्रमाण दुप्पट होते. उपलब्ध पाण्यासाठी जूनपर्यंत पुरवण्यासाठी विभागाची नियोजन सुरू आहे.
- पी. एम. पाटील, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com