
कोल्हापूर..मुख्य रस्त्यावर पार्किंगचा अडथळा.. पदपथांची वाणवा .. बोंद्रे नगर समस्या भाग ५
04577
बोंद्रेनगर समस्या भाग ५
मुख्य रस्त्यावर पार्किंगचा अडथळा
पदपथांची वानवा; पादचाऱ्यांसह वाहतूकदारांना त्रास
कोल्हापूर, ता. २५ ः फुलेवाडी रिंगरोडवरील वाहनांची वर्दळ व तेथील स्क्रॅप, जुन्या नादुरुस्त अवजड वाहनांचे पार्किंग यामुळे रस्ता नागरिकांसाठी धोका ठरत आहे. गर्दीत रस्त्याकडेला पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी पदपथांची निर्मिती केली जाते. मात्र, अनेक वर्षांपासून या मागणीला केराची टोपली मिळालेली आहे. भरमसाट वाढणारी लोकवस्ती, वाहनांच्या कोंडीमुळे भरधाव वाहनांचा धोका आणि अवजड वाहनामुळे उडणारे धुळीचे लोट अशा अनेक समस्यांतून नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे आरोग्य बिघडत आहे.
परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कॉलनी असून कॉलनीत प्रवेश करताना किंवा मुख्य रस्त्यावर येताना अनेकदा पार्किंग वाहनांचा अडथळा निर्माण होतो. या कॉलनीमध्ये सामान्य कुटुंबांचे वास्तव्य आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे, पार्किंग, विक्रेते यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे पादचारी असुरक्षित असून अनेकदा विद्यार्थी घरात येईपर्यंत जीवाची घालमेल होत असते. मुख्य रस्त्यावर भाजी मंडई, पार्किंग, अतिक्रमण यातून होणाऱ्या धोकादायक वाहतुकीमुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
चौकट ..
रस्त्यावर अवजड वाहनांचे पार्किंग.
रिंगरोडवरील मुख्य ठिकाणी मोठ्या व अवजड स्क्रॅप वाहनांचे पार्किंग अनेक वर्षापासून आहे. येथे वाहतुकीचा धोका तर आहेच, तसेच रस्त्यावर अडगळ होऊन कोंडाळे तयार झाल्याने दुर्गंधीची समस्या तयार होत आहे.
कोट ..
अंतर्गत रस्ते नाहीत. त्याचा त्रास होतो. मुख्य रस्त्यावरही पार्किंग, भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परिसरात गटारी, सांडपाण्याचा प्रश्न आहे . औषध फवारणीही होत नाही. स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे.
- प्रिया शिवाजी पाटील, राजे संभाजीनगर