कोल्हापूर . .पॅरा बॅडमिटन खेळाडू आरती पाटील ला आर्थिक पाठबळाची गरज ..

कोल्हापूर . .पॅरा बॅडमिटन खेळाडू आरती पाटील ला आर्थिक पाठबळाची गरज ..

खेळातील वाटचालीसाठी सहकार्य करावे ः आरती पाटील

कोल्हापूर, ता. २१ : मी सध्या आशियाई खेळ, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि पुढील वर्षी होणारी पॅरिस ऑलिम्पिकसह काही महत्त्वाच्या आगामी स्पर्धांसाठी तयारी करत आहे. याकरीता पॅरा बॅडमिंटनपटू म्हणून माझ्या आगामी वाटचालीसाठी तुमच्या आर्थिक पाठिंब्याची गरज आहे, अशी माहिती उचगाव (ता. करवीर) येथील पॅरा बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरती पाटील म्हणाल्या, ‘मी २०११ पासून पॅरा बॅडमिंटन खेळत आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मी विविध स्पर्धा खेळली आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. यामध्ये नऊ ते १४ मे मध्ये थायलंड, १७ ते २२ मे मधील बहरीन, १४ ते १८ जून दरम्यान होणारी कॅनडा, तीन ते नऊ जुलै रोजी युगांडा, दोन ते सहा ऑगस्टला होणारी चार नॅशनल आंतरराष्ट्रीय स्पर्धा, चार ते १० सप्टेंबरला होणारी इंडोनेशिया, एक ते पाच ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया, २० ते २८ ऑक्टोबरला आशियाई, सात ते १२ नोव्हेंबरला होणारी जपान पॅरा बॅडमिंटन स्पर्धा होत आहे.यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. शिवाय, प्रशिक्षण आणि तयारीसाठी महिन्याचा खर्च हा ५८ हजार रुपये येतो. याकरीता मला विश्वास आहे की, तुमचे सहकार्य मला पॅरा बॅडमिंटन खेळाडू म्हणून माझी क्षमता पूर्ण करण्यात आणि जागतिक स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मदत करेल.
सेटलर बॅडमिंटन ग्रुपचे कोच मंदार कानिटकर, अमित पाटील, जितेंद्र शिंदे व पालक उपस्थित होते ..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com