
कोल्हापूर . .स्टॉपलाईनवर वाहनधारकांचे अतिक्रमण ..
04774
शहरात झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने
अनेक चौकांत पट्टे गायब; पादचाऱ्यांची गैरसोय, कारवाईकडे लक्ष
कोल्हापूर, ता. २८ : वाढती वाहतूक आणि वाहतूक कोंडीमुळे मुख्य चौकात तरी नागरिकांना रस्ता ओलांडणे सहज शक्य व्हावे यासाठी महापालिका व वाहतूक पोलीस प्रशासनाकडून झेब्रा क्रॉसिंग केलेले आहेत. मात्र झेब्रा क्रॉसिंगवर अतिउत्साही वाहनधारक स्टॉपलाईनवरच थांबत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याबाबत वाहतूक पोलिस कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, महाराजा हॉटेल चौक, सीपीआर चौक, महापालिका चौकात नेहमी वर्दळ असते. यापैकी अनेक चौकांतील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीसे झाल्याने स्टॉपलाइन दिसतच नाही. त्यामुळे त्यांची वाहने झेब्रा क्रॉसिंगवर थांबतात. यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
जनजागृती गरजेची..
वाहतूक पोलिसांनी प्रत्येक चौकात सिग्नलवर थांबणारी वाहने स्टॉपलाईन ओलांडणार नाहीत, यासाठी कारवाई सुरू केली तर वाहनधारकांना स्टॉपलाईनपूर्वी थांबण्याची सवय लागेल. तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे होईल. याबाबत जनजागृतीसह काहीवेळा कारवाई होण्याची गरज आह.
कोट ..
वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळावेत. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. झेब्रा क्रॉसिंग, पट्टे मारण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
- ए. डी. फडतरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
कोट -
वाहनधारक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन थांबत असल्याने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना अडचण होते. काही मुख्य चौकातील झेब्रा क्रॉसिंग पट्टे गायब झाले आहेत. याबाबत कारवाई व्हावी.
धोंडीराम पागडे - प्रवासी