अभिषेक गवळी यांची म्हैस प्रथम

अभिषेक गवळी यांची म्हैस प्रथम

04822
कोल्हापूर : दयावान ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित म्हैशीच्या शर्यतीतील क्षण.


अभिषेक गवळी यांची म्हैस प्रथम
संदिप पाटील यांची म्हैस द्वितीय; ‘दयावान’च्या वर्धापन दिनी स्पर्धा
कोल्हापूर, ता. ६ : शिवाजी पेठ येथील दयावान ग्रुपतर्फे वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा म्हैस धारक असोसिएशनच्या मान्यतेने मोटरसायकल बरोबर म्हैस व रेडकू पळवण्याच्या शर्यती झाल्या. साकोली कॉर्नर येथून या शर्यतीला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला. अभिषेक गवळी यांच्या म्हशीने सात हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. संदिप पाटील यांच्या म्हशीने पाच हजार रुपयासह द्विताय व धीरज जांभळे पाचगाव यांच्या म्हशीने तृतीय पारितोषिक पटकावले.
रेडकू विभागात अनुक्रमे; साईराज भोसले - मोरेवाडी यांच्या रेडकाने पाच हजार, सागर बराले - कळंबा तीन हजार व जालिंदर पोवार - कळंबा दोन हजार अशी पारितोषिक पटकावली.
म्हशीच्या गटात एकूण २५, तर रेडकांच्या गटात ३० रेडके सहभागी झाली होती. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सत्यजित कदम, इंद्रजीत बोंद्रे, चंद्रकात पाटील - कौलवकर, श्रीकांत पाटील, अध्यक्ष प्रताप देसाई, गणेश पाटील, सुधाकर सरनाईक आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. समीर वर्णे, सुरेश सुतार, दिपक सुतार, किरण देसाई, विशाल जाधव, योगेश पोवार, योगेश पाटील आदींनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com