Thur, Sept 21, 2023

कंदलगाव ..कृषी पंपाच्या दोनशे फुट केबलची चोरी ..
कंदलगाव ..कृषी पंपाच्या दोनशे फुट केबलची चोरी ..
Published on : 12 May 2023, 7:10 am
04865
कंदलगावात कृषी पंपाच्या
दोनशे फूट केबलची चोरी
कंदलगाव, ता. १२ : येथे शेतामधील कृषी पंपाची दोनशे फूट केबल अज्ञाताने रात्री चोरून नेली. आज (ता. १२ ) सकाळी केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला.
हूरगोंडाचा ओढा येथे अर्जुन पुंदिकर यांची शेती आहे. अर्जुनचे चुलत भाऊ अजित पुंदीकर आज पंप सुरू करण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चार हजार रुपये किंमतीची केबल चोरट्याने लंपास केली असल्याचे अजित पुंदिकर यांनी सांगितले. कंदलगाव व परिसरात असे वारंवार प्रकार घडत आहेत. किरकोळ रकमेच्या चोरी असल्याने शेतकरी याची नोंद पोलिसात देण्यासाठी जात नाहीत . त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे. या परिसरात संबंधित पोलिसांनी गस्त वाढवावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.