कंदलगाव ..फणस घ्या फणस ..शहरासह उपनगरातील चौकाचौकात फणसाची दरवळ ..

कंदलगाव ..फणस घ्या फणस ..शहरासह उपनगरातील चौकाचौकात फणसाची दरवळ ..

04900
कोल्हापूर ः जवाहर नगर चौकात विक्रीसाठी आलेले फणस .

शहरासह उपनगरातील चौकाचौकात फणसाचा दरवळ

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव ,ता. २२ ः फणस म्हटलं की काटेरी मोठे आणि रसाळ गरे असणारे फळं आपल्या डोळ्यासमोर येते. दरवर्षी मे महिन्यात या फळाची मोठ्या प्रमाणावर परिसरात आवक होते. शहर व उपनगरातील चौकाचौकात या फणसाचा दरवळ आहे.
गगनबावडा, आजरा, चंदगड यासह तळ कोकणातून येणाऱ्या या फणसाचे सध्या ७० रुपयांपासून २०० रुपये पर्यंत दर आहेत . शक्यतो हे दर फळाच्या आकारावरून ठरतात.
सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. फणसात अनेक औषधी गुणधर्म आहेत. फणसाचे गरे व आठळे दोन्हीमध्येही औषधी गुणधर्म आहेत. फणसाचे साधारणपणे वजन २०-२२ किलोपासून ४० किलोपर्यंत असते.
पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो. फणसाचे गर व आठळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते तसेच प्रथिने, मेद, खनिजे, आद्र्रता, तंतुमय, पिष्टमय पदार्थही असतात. या सर्व गुणधर्मामुळे शरीर संवर्धनासाठी, पचनशक्ती वाढविण्यासाठी फणसाचा उपयोग होतो.

कोट
कोकणात फणस जास्त आहेत. परंत, वाहतूक खर्चामुळे परवडत नाही. दिवसाकाटी सहा-सात नगांची विक्री होते. गाडी खर्च, रोजंदारीचा विचार केला तर हातात काही राहत नाही.
-बयाबाई दगडू कात्रट,
-भागोजी बोडेकर. विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com