Sun, Sept 24, 2023

कंदलगाव ..पाचगाव गरुड तलावाच्या काठावर बेवारस दुचाकी..
कंदलगाव ..पाचगाव गरुड तलावाच्या काठावर बेवारस दुचाकी..
Published on : 16 May 2023, 6:12 am
पाचगाव ः गरुड तलावात काठावर बेवारस अवस्थेत पडलेली दुचाकी .
04916,
04917
....
पाचगावमधील गरुड तलावाच्या
काठावर बेवारस दुचाकी
कंदलगाव, ता. १६ः पाचगाव येथील गरुड तलावाच्या काठावर दोन दिवसांपासून बेवारस दुचाकी आढळून आली आहे . या दुचाकीच्या दोन्ही नंबरप्लेट काढण्यात आल्या असून तलावाच्या काठावरून ही मोटारसायकल अज्ञातांनी तलावात ढकलून दिल्याचे घटनास्थळावरून समजते . उन्हामुळे तलावातील पाणी पातळी कमी असल्याने तलावाच्या काठालाच ही मोटारसायकल पडलेली आहे.
पाचगाव येथील गरुड तलाव हा लोकवस्तीपासून काही अंतरावर निर्जनस्थळी आहे. नंबरप्लेट काढून मोटारसायकल खाली ढकलून देण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंदेरी रंगाची ही दुचाकी असून दोन्ही पंखे गायब आहेत.
..