बालकांसाठी २९ पासून डे नाईट फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकांसाठी २९ पासून
डे नाईट फुटबॉल स्पर्धा
बालकांसाठी २९ पासून डे नाईट फुटबॉल स्पर्धा

बालकांसाठी २९ पासून डे नाईट फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

बालकांसाठी २९ पासून
डे नाईट फुटबॉल स्पर्धा
‘एस थ्री सॉकर’तर्फे आयोजन
कोल्हापूर, ता. २५ : फुटबॉलसह क्रीडा विश्‍वातील उगवत्या गुणवंतांना योग्य संधी देण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे कार्यरत असलेल्या एस थ्री सॉकर अकॅडमीतर्फे पश्चिम महाराष्ट्रात प्रथम शालेय पातळीवर डे- नाईट फ्लड लाईटमध्ये फुटबॉल स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धा मेरी वेदर मैदानावर २९ व ३० मे रोजी होणार आहेत. सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत होणाऱ्या स्पर्धेमध्ये दहा-बारा आणि चौदा वयोगटातील सामन्यात कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यातील युवा आणि बाल खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक निखिल सावंत व अवधूत भाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सावंत म्हणाले, ‘‘या स्पर्धा कोल्हापूरच्या फुटबॉल - क्रीडा विश्वाची आगामी काळात एक अनुकरणीय विधायक ओळख ठरणार आहे.यासाठी स्पर्धा संयोजक व एस थ्री सॉकर अकॅडमीचे संस्थापक अमित साळोखे, प्रमोद खवरे,सतिश जाधव,सौरभ भोसले यश गडकरी, कपिल मुदलगीकर,अमित साळुंखे,मंगला भाटे, प्रियंका भोसले यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गेले अडीच महिने कार्यरत आहेत. तरी या स्पर्धा उपक्रमास सर्व सेवाभावी संस्था तसेच क्रीडाप्रेमी उद्योजकांनी पाठबळ द्यावे तसेच २९ आणि ३० मे रोजी या स्पर्धेत उपस्थित राहून उगवत्या प्रतिभेच्या खेळाडूना सर्वांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन ही संयोजकांनी केले आहे. या वेळी प्रमोद खवरे, अमित साळुंखे , मंगला भाटे यांची उपस्थिती होती.