‘नेवगी कर्णबधिर’तर्फे पहिलीच्या वर्गाची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नेवगी कर्णबधिर’तर्फे 
पहिलीच्या वर्गाची सुरुवात
‘नेवगी कर्णबधिर’तर्फे पहिलीच्या वर्गाची सुरुवात

‘नेवगी कर्णबधिर’तर्फे पहिलीच्या वर्गाची सुरुवात

sakal_logo
By

‘नेवगी कर्णबधिर’तर्फे
पहिलीच्या वर्गाची सुरवात
कोल्हापूर, ता. ३१ : ‘लवकर निदान, तर मूल बोलेल छान’ ही संकल्पना जगात नुकतीच सुरू होत होती. यावर आधारित लहान कर्णबधिर मुलांची नर्सरी रोटरी समाज सेवा केंद्राने सुरू केली. सहा महिन्यांपासून सहा वर्षे वयाची कर्णबधिर दिव्यांग मुले येथे शिक्षण घेत आहेत. भविष्यात हेच शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी नेवगी कर्णबधिर व वीर ककैय्या विद्यालयाच्या सहभागाने कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी पहिलीचा वर्ग सुरू करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष सुरेश गुळवणी यांनी दिली.
गुळवणी म्हणाले, ‘‘मुलांच्या शिक्षणासाठी आसपासच्या खेड्यांतून, शहरांतून पालक येऊ लागले. तळमळीने शिकवणारा प्रशिक्षित शिक्षकवर्ग, सर्व अद्ययावत सुविधा यामुळे संख्या मुलांची वाढू लागली. शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलेलाही उत्तेजन देण्यासाठी चित्रकला, मातीकाम, चिकटकाम, रंगकाम आदीचे धडे दिले जात आहेत.
कालांतराने असे लक्षात आले आपण मुलांना कष्ट घेऊन त्यांना बोलायला शिकवतो. पण सामान्य शाळेत त्यांची प्रगती होण्याऐवजी मुले खुणा व हातवारे करू लागतात. त्यावर विचारविनिमय, चर्चा झाली. त्यानुसार पहिलीला सामान्य मुलांच्या शाळेत वीर ककैय्या विद्यालय या जोडशाळेत पहिलीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या जोडशाळेच्या परवानगीसाठी प्राथमिक शिक्षण समितीचे एम. के. यादव, सर्व शिक्षा अभियानाचे प्र. समन्वयक अप्पुगडे, वीर ककैय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.’’
या वेळी राजेंद्र देशिंगे, जेठाबाई पटेल, अरविंद तराळ, स्वाती गोखले, उषा कुलकर्णी, गायत्री पुराणिक, शोभा अरविंद, वैशाली तराळ, मुख्याध्यापक धनंजय भादोले, पालक उपस्थित होते.