कोल्हापूर . .सुधारीत बातमी .. जागतिक पर्यावरण दिना निमीत्त्य वृक्षारोपन ..

कोल्हापूर . .सुधारीत बातमी .. जागतिक पर्यावरण दिना निमीत्त्य वृक्षारोपन ..

05038

जिल्ह्यात पर्यावरण जागृतीचा जागर
पर्यावरणदिनी विविध उपक्रम;

कोल्हापूर , ता.५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षप्रेमी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दुधाळी मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब, जारूळ, कांचन, आंबा, करंज, बूच, टेबु बिया रोझिया, महोगणी ही झाडे लावण्यात आली.
ऑक्सीजन वॉलसाठी प्रयत्न
या मैदानावर फुटबॉल टर्फ नव्याने झालेले आहे. परंतु तिथे झाडांची सावली नाही . त्यामुळे विशेषता खेळाडूंना तिथे सावलीमध्ये गारव्यामध्ये व्यायाम तसेच इतर क्रीडा प्रकार करता यावेत यासाठी आजच्या वृक्षारोपणाने एक ऑक्सिजन वॉल तयार करण्याचा वृक्षप्रेमी संस्थेचा प्रयत्न आहे . यासाठी भागातील पर्यावरण , वृक्षप्रेमींनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महापालिका उद्यान विभाग अधिकारी समीर व्याग्रांबरे, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी, नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढढे, गणेश कचरे, मन्सूर गोवावाला, प्रवीण मगदूम, सतीश कोरडे, सविता साळोखे, विद्या पाथरे, अर्चना कुलकर्णी, धनश्री भगत, मनीषा कांबळे,विशाल पाटील, राम चव्हाण उपस्थित होते.

01684
रंकाळ्यावर झाडांचा वाढदिवस
फुलेवाडी ः ऐतिहासिक रंकाळ्यावर पदपथ उद्यानात लावलेल्या झाडांचा वाढदिवस रंकाळाप्रेमींनी उत्साहात केला. दै. ‘सकाळ’च्या प्रेरणेने जून २०११ मध्ये ''चला झाडे लावूया'' या उपक्रमांतर्गत रंकाळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वृक्ष लागवड व संवर्धन ही चळवळच बनवून गेली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दुर्मिळ अशा बोधिवृक्षाला फुगे,पताका लावून तसेच रांगोळी काढून, झाडांना पाणी घालून येथील झाडांचा वाढदिवस साजरा केला.
रंकाळा संरक्षण व संवर्धन समितीचे विकास जाधव म्हणाले, जागतिक तापमान वाढत असताना वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. दैनिक सकाळने राबवलेली ही विधायक चळवळ लोकांनी मनावर घेतली आणि रंकाळा परिसर हिरवागार बनविला आहे.
वृक्षलागवडी बरोबरच त्याचे संवर्धन करणे आज काळाची गरज असल्याचे दिलीप देसाई व राजेंद्र इनामदार यांनी सांगितले.
यावेळी संजय मांगलेकर, अभिजीत चौगुले ,विजय सावंत, यशवंत पाटील, संभाजी पाटील, प्रवीण वायचळ ,सुधीर राऊत ,राजशेखर तंबाके, दीपक गायकवाड, इंद्रजीत साळोखे, आनंदराव कोरे, विशाल चावरे, कालेकर सराफ, प्रशांत लांबा, विवेक भिडे, राजा उपळेकर, सुनील जाधव, राजू गाडगीळ, जितेंद्र लोहार, परशुराम नांदवडेकर डॉ.देवेंद्र रासकर, पद्माकर रेळेकर उपस्थित होते.रंकाळा समितीचे राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. किरण पडवळ यांनी आभार मानले.


07273
तुळशी वृंदावन वाटप
कोल्हापूर ः महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानाने बिनखांबी गणेश मंदिरपासून महाद्वार रोड स्वच्छ करून तुळशी वृंदावन वाटप करण्यात आले.
प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याची निगा राखावी. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी नागरिकांनी सुद्धा परिसर कसा स्वच्छ राहील याकडे पाहिले पाहिजे. दोघांनीही अंबाबाई मंदिर परिसर स्वच्छ राहील याची जबाबदारी स्वीकारली तरच कोल्हापूर शहर आदर्श बनेल, असे महाद्वार रोड व्यापारी रहिवासी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव जोशी यांनी सांगितले. भाजपचे हेमंत आराध्ये यांनी नागरिकांची जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. महादेव यादव महाराज, श्री महालक्ष्मी अन्नछत्रचे अध्यक्ष राजू मेवेकरी, संस्थेचे कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर, अमित माने, शिवनाथ पावसकर, आकाश पाटील, सागर कदम, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, ऋषिकेश सरनाईक, सिकंदर बनगे, शशिकांत देढिया आदी उपस्थित होते.

01873
आंबा येथे वृक्षदिंडी
आंबा ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव आंबा परिक्षेत्राच्या वतीने रॅली व वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी आंबा घाटाशेजारी वृक्षारोपण करण्यात आले. परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार नलवडे, वनपाल सागर पोवार, माजी उपसभापती बाळासाहेब गद्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक कोलते, नीलेश कामेरकर, संजय कांबळे, कृष्णा दळवी, अनिल गवरे, मारुती पाटील, वनरक्षक अरविंद पाटील, वनमजूर सीताराम पाटील, किरण दळवी, नामदेव पाटील, बाबासो कांबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com