श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पालखी सोहळा
श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पालखी सोहळा

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पालखी सोहळा

sakal_logo
By

05701
कोल्हापूर : गंगावेश येथील श्रीकृष्ण सरस्वती वैराग्य मठाकडून काढलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी भाविक. (छायाचित्र : प्रकाश पाटील)

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पालखी सोहळा
कोल्हापूर, ता. ९ : गंगावेश येथील वैराग्य मठात १२३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दत्त गल्ली श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज सकाळी ६ वा. श्रींना अभिषेक व महापूजा तसेच सकाळी ११ वा. भजन व दुपारी १२.३० वा. पालखी मिरवणूक निघाली. गंगावेश, पंचगंगा हॉस्पिटलमार्गे पंचगंगानदी असा पालखीचा मार्ग होता.
दरम्यान, पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंदिरात सुगम संगीत, भावभक्ती गीत, श्रीकृष्ण जन्मकाळ, किर्तन, महापूजा आदी कार्यक्रम झाले. पालखी सोहळ्याचे नियोजन महेश शिर्के आणि डॉ. कृष्णनाथ शिर्के यांनी केले. गंगावेश येथील क्रांती मित्र मंडळ व संयुक्त गंगावेश मित्र मंडळाकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आला.