भेंडवडेत आजपासून ठिय्या आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेंडवडेत आजपासून ठिय्या आंदोलन
भेंडवडेत आजपासून ठिय्या आंदोलन

भेंडवडेत आजपासून ठिय्या आंदोलन

sakal_logo
By

भेंडवडेत आजपासून
ठिय्या आंदोलन
खोची : भेंडवडे येथील पूरग्रस्त बचाव समितीतर्फे उद्यापासून (ता. ४) विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती पूरग्रस्त बचाव समितीच्या वतीने दिली. मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. पूरग्रस्तांना गायरान जमिनीत प्रत्येक कुटुंबाला दीड गुंठे जागा द्यावी. जागा देताना जाचक अटी रद्द कराव्यात. गायरानातील अतिक्रमणे काढावीत. पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरणाऱ्या खोची व कुंभोज पुलाचा भराव काढून तेथे पाणी जाण्यासाठी मार्ग करावा आदी मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व अशोक एडके, हर्षवर्धन चव्हाण, सदाशिव कोळी, अजित देसाई, सुनील देसाई, दीपक वासुदेव, हंबीरराव पसाले, राजेंद्र मालगावे, श्रेणिक देसाई आदी करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02051 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top