पूरग्रस्त समिती स्थापण्यासह विविध ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्त समिती स्थापण्यासह विविध ठराव
पूरग्रस्त समिती स्थापण्यासह विविध ठराव

पूरग्रस्त समिती स्थापण्यासह विविध ठराव

sakal_logo
By

02036

----
पूरग्रस्त समिती स्थापण्यासह विविध ठराव
पूरग्रस्त बचाव कृती समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेंडवडेत ग्रामसभा
खोची, ता. ९ : भेंडवडेतील पूरग्रस्त बचाव कृती समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभा बोलावली होती. या वेळी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामसभेसाठी ग्रामस्थांची गर्दी होती. ग्रामसभेत चर्चा सुरू असताना गोंधळ झाला. पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच काकासाहेब चव्हाण होते.
ग्रामसेवक संतोष चव्हाण यांनी विषयवाचन केले. पूरग्रस्त बचाव समितीतर्फे काही प्रमुख मागण्या ग्रामसभेत मांडल्या. ग्रामसभेत पूरग्रस्त समिती स्थापन करणे, गायरानात जागा देण्याबाबत शासनाच्या असणाऱ्या जाचक अटी रद्द करणे, गायरान क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करणे, गायरानक्षेत्रातील शेतीचे अतिक्रमण काढणे व पूरग्रस्त ग्रामस्थांसाठी क्रेडाई संस्थेकडून मदतीसंदर्भात संस्थेचे अभिनंदन करणारे ठराव संमत केले. बाळासाहेब माने, सुनील पसाले, सुनील देसाई, हर्षवर्धन चव्हाण, अशोक एडके यांनी विविध समस्या मांडल्या. दरम्यान, पूरग्रस्त बचाव समितीतर्फे सर्वच मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. ग्रामसभेस उपसरपंच डॉ. संजय देसाई, अभिजित माने, सुहास देसाई, जयसिंगराव निकम, उदय माने, शीतल भिसे, प्रकाश कोळी, हनुमंत पोवार, महावीर कांबळे, बाळासाहेब पाटील, रवी पोवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
पालकमंत्र्यांना निवेदन
पूरग्रस्त बचाव कृती समितीतर्फे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी मंत्री पाटील यांनी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याशी चर्चा करून पूरग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशा सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवून योग्य ती कार्यवाही करावी, असे सांगितले. या वेळी समितीचे हर्षवर्धन चव्हाण अशोक एडके, सुनील देसाई, बाळासाहेब निकम, अजित देसाई उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02065 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top