भेंडवडेतील पूरग्रस्तांची शरद पवारांशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेंडवडेतील पूरग्रस्तांची  शरद पवारांशी चर्चा
भेंडवडेतील पूरग्रस्तांची शरद पवारांशी चर्चा

भेंडवडेतील पूरग्रस्तांची शरद पवारांशी चर्चा

sakal_logo
By

02041

----
भेंडवडेतील पूरग्रस्तांची
शरद पवारांशी चर्चा
खोची, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेंडवडे येथील पूरग्रस्त बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी २०१९ ला आलेला महापूर, अतिवृष्टीवेळी भेंडवडेतील नागरिकांना शरद साखर कारखान्यावर स्थलांतरित केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी स्थलांतरित झालेल्या कुटूंबाची भेट घेऊन व व्यथा ऐकून चर्चा केल्याच्या घटनेचा तसेच कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विचारविनिमय करून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
तसेच गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे अतिनुकसान झाले आहे. येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी युवा आघाडी तालुका प्रमुख हर्षवर्धन चव्हाण, सुनील पसाले, अशोक एडके, सुनील देसाई, रावसाहेब पाटील, अण्णासाहेब रोकडे, उत्तम निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02069 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top