पान ३ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ स पटा
पान ३ स पटा

पान ३ स पटा

sakal_logo
By

01384
तुरुकवाडी घाटात
टेम्पो उलटून एक जण जखमी
तुरुकवाडी : मलकापूर-तुरुकवाडी दरम्यानच्या तुरुकवाडी घाटात टेम्पो उलटून एक जण जखमी झाला. कराड-रत्नागिरी राज्य मार्गावरील तुरुकवाडी घाटात पुट्याची वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच.१४,ऐ.एल .३४८) हा कराडहून रत्नागिकडे निघाला असता धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. यात वाहनचालक दत्ताराम वायकूळ जखमी झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत शाहूवाडी पोलिसांत नोंद झाली नाही.

भेंडवडे येथे चोरीचा अयशस्वी प्रयत्न
खोची ः भेंडवडे येथे चोरट्यांनी माऊली बझार व सहकारी संस्थेचे मुख्य दरवाजाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.
सेंट्रल लॉकमुळे बझारचे शटरच उघडता आले नाही. विशेष म्हणजे बझारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसत आहेत. चेहरे मात्र त्यांनी लपवले आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास भेंडवडे येथील स्वाभिमानी दूध संस्थेच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन्ही तिजोरीतील साहित्य विस्कटले.
त्यांच्या हाताला काहीही लागले नाही. यात एक तिजोरी डेअरीची व दुसरी तिजोरी जिनपाल देसाई विकास सेवा संस्थेची कागदपत्रे असलेली होती.
त्यानंतर जवळच असलेल्या माऊली सुपर बझारच्या शटरची दोन्ही कुलुपे कटावणीने उचकटली, परंतु सेन्ट्रल लॉक असल्याने शटर उघडता आले नाही. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे दिसत आहेत. चार जण असून, त्यांनी तोंडाला कापड बांधलेले होते.

शेळी चोरीप्रकरणी एकाला अटक
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील एकाला शेळी चोरीप्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केली. शिवाजी रामा पुजारी असे त्याचे नाव आहे. त्याने १ ऑगस्टला शेळीचे पिल्लू चोरी केले होते. याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता शिवाजी पुजारी याने शेळीचे पिल्लू चोरून मटण दुकानात विक्रीसाठी नेल्याची कबुली दिली. याबाबत अनिल दत्तात्रय पुजारी (रा. कोरोची) यांनी फिर्याद दिली होती. यापूर्वीही शिवाजी पुजारी याला शेळी चोरीप्रकरणी अनेकवेळा ताब्यात घेतले होते.

कोरोचीत एकाची आत्महत्या
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे एकाने राहत्या घरी आत्महत्या केली. विशाल प्रकाश माने (वय ३२, रा. साईनगर, कोरोची) असे त्याने नाव आहे. घराच्या छताच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी बाबासो कोरवी (वय ४०) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

विषारी औषधप्राशन
केल्याने महिलेचा मृत्यू
इचलकरंजी : उंदिर मारण्याचे औषधप्राशन केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. श्रीमती माधवी गोकुळ गुंजकर (वय ५६ रा. गणेशनगर) असे तिचे नाव आहे. विषारी औषधप्राशन केल्यामुळे तिला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. याबाबत खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिका‍ऱ्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.

पाचगावात तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर : पाचगाव येथील रायगड कॉलनीत राजू सुनील मुळे (वय २६, मूळ पंढरपूर) याने आत्महत्या केली. आज दुपारी ही घटना घडली. सीपीआरमध्ये शिवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू हा काही महिन्यांपूर्वीच व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये राहण्यास आला होता. रायगड कॉलनी येथील भाड्याच्या घरात पत्नी व मुलासोबत राहत होता. पत्नी व मुलाला त्याने काही दिवसांपूर्वी पंढरपूरला पाठवले होते. आज तो घरी एकटाच होता. दुपारी त्याने घराच्या तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारच्यांनी त्याला सीपीआरमध्ये नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02147 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..