Wed, Feb 8, 2023

खोची हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
खोची हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
Published on : 13 December 2022, 10:51 am
खोची हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
खोची ः येथील खोची हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ झाला. महोत्सवाचा प्रारंभ सरपंच अभिजित चव्हाण यांनी केला. संस्थाध्यक्ष प्रा. बी. के. चव्हाण, माजी उपसरपंच एम. के. चव्हाण, मुख्याध्यापक के. एस. माळी, क्रीडाशिक्षिका प्रतिभा पाटील, राजवर्धन चव्हाण प्रमुख उपस्थित होते. सरपंच अभिजित चव्हाण यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये होत असलेल्या विविध घडामोडींची माहिती दिली. माजी उपसरपंच एम. के. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती बाळगून यशस्वी होण्यासाठी वाटचाल करावी, असे आवाहन केले. क्रीडाशिक्षिका प्रतिभा पाटील यांनी स्वागत केले. राजवर्धन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.