आईच्या आठवणींचे पुस्तक कार्यकर्तृत्वाचा आलेख

आईच्या आठवणींचे पुस्तक कार्यकर्तृत्वाचा आलेख

02515
नरंदे ः येथे शिंपल्यातला मोती-गाथा जिद्दी सुनंदाची या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. गोविंद ढवळे, अशोक केसरकर, सुधाकरराव मणेरे, लेखिका प्रा. अंजना चौगुले-चावरे, दादासाहेब चौगुले, आण्णासाहेब चौगुले, संजय चौगुले, प्रतिभा चौगुले, दिपाली चौगुले आदिंनी केले.
----------------
आईच्या आठवणींचे पुस्तक कार्यकर्तृत्वच
डॉ. महावीर अक्कोळे; प्रा. अंजना चौगुले-चावरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
खोची, ता. २७ ः आईच्या आठवणीतून साकार झालेल्या पुस्तकाला वेगळी सामाजिक किनार लाभली असून पुस्तकरूपाने आईच्या आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे तिच्या कार्यकर्तृत्वाचा आलेखच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले.
ते नरंदे येथे प्रा. अंजना चौगुले-चावरे यांच्या ‘शिंपल्यातला मोती-गाथा जिद्दी सुनंदाची’ या पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गोविंद ढवळे होते.डॉ. सुभाष आडदंडे, साहित्यिक अशोक केसरकर, सुधाकरराव मणेरे, अण्णासाहेब चौगुले, दादासाहेब चौगुले, संजय चावरे (शिरोळ), बबन हुपरे (कुंभोज), उद्योजक संजय चौगुले प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ‘सकाळ’ने प्रकाशन केलेल्या शिंपल्यातला मोती-गाथा जिद्दी सुनंदाची या पुस्तकाचे प्रकाशन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गोविंद ढवळे म्हणाले,‘लेखिका प्रा. अंजना चौगुले-चावरे यांनी पुस्तक रूपातून आईच्या यशाची गाथा सांगितली आहे. आईची पुस्तकरूपी आठवण समाजाला प्रेरणा देणारी ठरेल.’ सुभाष आडदंडे, अशोक केसरकर, सुधाकर मणेरे, बातमीदार रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. चौगुले कुटुंबियांकडून नरंदे येथील जैन समाज्याच्या सांस्कृतिक सभागृहासाठी एक लाख पंचवीस हजारांच्या देणगीचा धनादेश दिला. स्वागत व प्रास्ताविक दादासाहेब चौगुले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रतिभा चौगुले यांनी केला. आभार प्रा. दिपाली चौगुले यांनी मानले. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती राजकुमार भोसले, रवींद्र अनुसे, प्रतापराव देशमुख, मुख्याध्यापक पांडव, शिवाजी इंगळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com