खोचीसाठी निधी कमी पडू देणार नाही

खोचीसाठी निधी कमी पडू देणार नाही

02554
खोची ः येथील भैरवनाथ मंदिराजवळ उभारलेल्या कुस्ती आखाड्याचे उद्‍घाटन आमदार राजू आवळे यांनी केले. प्रा. बी. के. चव्हाण, सरपंच अभिजीत चव्हाण, सुशेनराव शिंदे, जगदीश पाटील, सुनील पाटील, अनिल चौगुले आदी उपस्थित होते.
------
खोचीसाठी निधी कमी पडू देणार नाही
आमदार राजू आवळे; खोचीमध्ये कुस्ती आखाड्याचे उद्‍घाटन
खोची, ता. १७ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जिल्ह्यातील मल्ल पुढे यावेत म्हणून कुस्तीची सुरुवात केली. खोचीसाठी चार वर्षांत साडे आठ कोटी रुपये निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
ते येथील भैरवनाथ मंदिराजवळ उभारलेल्या कुस्ती आखाड्याच्या तसेच गणेश मंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता डांबरीकरण उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. प्रा. बी. के. चव्हाण, दीपकराव पाटील, सरपंच अभिजीत चव्हाण, माजी सरपंच जगदीश पाटील, सुशेनराव शिंदे, अजय पाटील, सुनील पाटील, सयाजी पाटील, दादासाहेब पाटील, अमरसिंह पाटील, धनाजी पोवार प्रमुख उपस्थित होते. येथील कुस्ती आखाड्यासाठी आमदार आवळे यांनी नऊ लाख रूपयांचा निधी दिला आहे.
आमदार आवळे म्हणाले, ‘भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद होता. त्यासाठी निधी देऊन रस्ता दुतर्फा केला आहे. वारणा नदीकडे पालखी मार्गावर कच्च्या रस्ता होता त्याचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर हनुमान मंदीराच्या रंगरंगोटीसाठी पाच लाख रूपयांचा निधी देऊ.’
प्रास्ताविक व्ही. ए. बाबर यांनी केले. सोनाजी थोरवत, नेमिनाथ मगदूम, सुनील कोळी, अनिल चौगुले, नंदकुमार आडके, अभियंता कुलदीप पाटील आदी उपस्थित होते. आभार एस. बी. जाखले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com