
‘जय शिवराय’ तर्फे खोचीत सभा
02569
खोची ः येथे जय शिवराय संघटनेच्यावतीने जनजागृती सभेत बोलताना शिवाजी माने. यावेळी उपस्थित चंद्रकांत पाटील, माणिक पाटील गुंडा इंगळे आदी.
-----------
‘जय शिवराय’ तर्फे खोचीत सभा
खोची, ता. ४ : भाव नियंत्रण कायदा आणि निर्यात बंदी यामुळेच देशातील शेतकरी श्रीमंत होत नसल्याचे प्रतिपादन जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केले.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, सर्व शेतमाल नियंत्रण मुक्त करा व उसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव द्या या मागण्यांसाठी येथे जनजागृती सभा झाली. शेतकऱ्यांनी मागण्या मान्य करून घेण्यासाठी २० मे रोजी सांगली येथे भावे नाट्यगृहात उपस्थित राहावे असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत पाटील होते. रावसाहेब ऐतवडे म्हणाले, ‘शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची बँकांची कर्जे थकीत जात असल्याचे सांगून वीज बिलेही शेतकरी भरू शकत नाहीत. यासाठी सरकारने शेती अनुषंगिक असणारी शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत व वीज बिलाची थकबाकी माफ करून दिवसा बारा तास वीज द्यावी.’ मौजे डिग्रजचे उदयसिंह पाटील, जय शिवरायचे शितल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. माणिक पाटील यांनी स्वागत केले. सुशांत पाटील यांनी आभार मानले. सुरेश पवार, नानासाहेब इंगळे, विवेक कुलकर्णी, दिनकर बाबर, यदूराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.