शहाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शहाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शहाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
खोची, ता. १२ ः आयुष्याच्या जीवनात महत्त्वाच्या असणाऱ्या जीवनपद्धतीत एकमेकांचा स्नेहभाव जपा. आई-वडिलांची सेवा करा. नवरा बायकोच्या नात्यातील आदर कायम ठेवा. मुलांना शैक्षणिक ज्ञान देऊन त्यांच्या आयुष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सक्षम करा. हे करत असताना त्यांना ज्येष्ठांचा आदर करण्यास शिकवून आदरयुक्त जीवन जगण्यास सांगा, असे आवाहन निवृत्त ज्येष्ठ शिक्षक व्ही. ए. बाबर यांनी केले.
येथील राजे शहाजी हायस्कूलच्या १९९४ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. चौगुले होते. माजी मुख्याध्यापक ए. एन. पाटील, बी. वाय. पवार, व्ही. पी. शिंदे-मिरजकर, एम. आर. शिंदे, जे. आर. कारंडे, एस. बी. जाखले, बी. टी. पाटील, ॲड. एस. पी. कुरणे, बी. बी. नायकवडी, मुख्याध्यापक एस. बी. पवार, एस. बी. नलवडे, आर. बी. बाबर, एस. एस. गायकवाड उपस्थित होते. माजी शिक्षकांनी २९ वर्षानंतर स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रत्येकाने एकमेकाची आपुलकीने चौकशी करून त्यांच्या सध्य परिस्थितीबद्दल जाणून घेतले. एकमेकांना असेच भेटून आपली मैत्री कायम ठेवूया, असे सांगताना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी एकत्र राहण्याची ग्वाही दिली. स्वागत व प्रास्ताविक भानुदास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले. आभार शरद बाबर यांनी मानले. ६२ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी, शिक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com