कळंब्याला शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा करा.. कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंब्याला शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा करा.. कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन
कळंब्याला शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा करा.. कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन

कळंब्याला शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा करा.. कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन

sakal_logo
By

पुईखडीतून कळंब्याला
पाणीपुरवठा करावा

ग्रामपंचायतीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

कळंबा, ता. ३ ः कळंबा तलावाची पाणी पातळी बारा फुटांवर पोहोचली आहे. पाणीसाठा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला असून, जलचक्रासाठी दहा फूट साठा शिल्लक ठेवावा लागणार आहे. त्यामुळे तलावात गावाला आठ ते दहा दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनाने शिंगणापूर योजनेतील पुईखडी येथील शुद्धजल केंद्रातून गावाला पाणीपुरवठा करावा, महापालिका प्रशासनाला आदेश तसे द्यावेत, असे निवेदन ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कळंबा तलावातून कोल्हापूर शहर, कळंबा व पाचगाव येथील नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र नागरी वस्तीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. दैनंदिन उपशामुळे तलावातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा करावा.
दरम्यान, या जलशुद्धीकरण केंद्रापासून गावापर्यंत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडली आहे. १० मे पासून गावाला पुरवठा करण्यासाठी महापालिकेला आदेश द्यावेत.
दरम्यान, कळंबा तलावाच्या दक्षिण बाजूस नागरी वस्तीसाठी प्लॉट पाडणाऱ्या बिल्डर्स व येथील अनेक व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने कारवाईची नोटीस पाठवली आहे. तलावांमध्ये नागरी वहिवाट व पाळीव जनावरे, वाहने धुणाऱ्या नागरिकांना थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. या नियमावलीचे दहा डिजिटल बोर्ड तलाव परिसरामध्ये लावण्यात येणार असल्याचे सरपंच सागर भोगम, उपसरपंच अरुण टोपकर, ग्रामविकास अधिकारी दिलीप तेलवी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Klb22b00945 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top