कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा होम वहन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा होम वहन सोहळा
कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा होम वहन सोहळा

कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा होम वहन सोहळा

sakal_logo
By

01512

श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या
उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कळंबा, ता. १० ः कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीची विविध रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे. बुधवार (ता. ११) रोजी भाकणूक कथनकार कृष्णात डोणे महाराज वाधापरे यांचा ओव्यांचा कार्यक्रम, गुरुवारी (ता. १२) सकाळी सात वाजता श्री महालक्ष्मी व श्री कात्यायनी देवीची भेट आणि पालखी सोहळा, शुक्रवारी (ता. १३) सकाळी सात वाजता होम हवन व घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य तसेच रात्री आठ वाजता मुख्य पालखी सोहळा व श्री हनुमान देवालयाची भेट, रात्री दहा वाजता श्री भैरवनाथ संगीत सोंगी भजनी मंडळ सोन्याची शिरोली यांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर शनिवारी (ता. १४) सकाळी ९ वाजता श्री महालक्ष्मी देवालयात श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर महाप्रसाद वाटप कार्यक्रम, रात्री दहा वाजता भूपाळी ते भैरवी एक नृत्यमय प्रवास असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवानिमित्त होणार आहेत. तरी याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायत प्रशासन व श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांनी केले आहे.
दरम्यान, या उत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अंबाबाई देवाच्या मंदिराला रंगरंगोटी करून भव्य रोषणाईने मंदिर सजवले आहे. तसेच बालचमूसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी व मनोरंजनाची अनेक साधने उभारण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Klb22b00952 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top