बापुराम नगरात चिकनगुनिया सदृश रुग्ण.. गटारी नसल्याने सांडपाणी साचले कचरा उठावाचा प्रश्‍न गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापुराम नगरात चिकनगुनिया सदृश रुग्ण.. गटारी नसल्याने सांडपाणी साचले कचरा उठावाचा प्रश्‍न गंभीर
बापुराम नगरात चिकनगुनिया सदृश रुग्ण.. गटारी नसल्याने सांडपाणी साचले कचरा उठावाचा प्रश्‍न गंभीर

बापुराम नगरात चिकनगुनिया सदृश रुग्ण.. गटारी नसल्याने सांडपाणी साचले कचरा उठावाचा प्रश्‍न गंभीर

sakal_logo
By

01533
बापूराम नगर व महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्या नजीक कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

बापुराम नगरात कचरा उठावाचा प्रश्‍न गंभीर

कळंबा ता. २९ ः कळंबा पश्चिम भाग उपनगरात सांडपाणी निर्गत करण्यासाठी गटारी नसल्यामुळे मोकळ्या जागा व मुख्य रस्त्यावरती हे पाणी साचून तळ्याचे स्वरूप येत आहे. तसेच अनेक नागरिक ओला व सुका कचरा घंटागाडीत न देता रस्त्याच्या कडेला उघड्यावरच टाकत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, उपनगरांचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र आहे.
कचरा उठाव करण्यासाठी कंटेनर वेळेत येत नसल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक घरांमध्ये ताप, कणकण व चिकनगुनिया सदृष्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाने राबवलेल्या कचराकुंडी मुक्त प्रभाग संकल्पनेला नागरिकांनीच तिलांजली दिल्याचे दिसत आहे.
कळंबा पश्चिम भाग व उपनगरांमध्ये दोनशेहून अधिक कॉलनी व नगरांचा समावेश आहे. तसेच तीन हजारपेक्षा जास्त लोकांची नागरी वस्ती आहे. मात्र नागरी सुविधांची वानवा येथे आहे. येथील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकाला खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. गटारी नसल्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी व्यवस्थित निर्गत होत नाही. परिणामी हे पाणी साचून मुख्य रस्ते व मोकळ्या जागा यांना तळ्याचे स्वरूप येत आहे. येथील अनेक नगरे व कॉलनी उंच सखल भागात असल्यामुळे अनियमित व अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाण्यासाठी कूपनलिका व विकतचा टॅंकर याचा आधार घेत आहेत. त्याचबरोबर येथील अनेक नागरिक घंटागाडी कडे ओला-सुका कचरा न देता मुख्य रस्ता मोकळी जागा या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहत आहे.

चौकट
भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला
रक्ताळलेले मटणाचे तुकडे, नाशवंत खाद्यपदार्थ अनेक नागरिक उघड्यावर आणून टाकत आहे. त्यामुळे पाळीव जनावरे, भटकी कुत्री यांचा वावर वाढला आहे. मुख्य रस्त्या नजीकच हे कचऱ्याचे ढीग असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व महिलांच्या अंगावर ही भटकी कुत्री चाल करून जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोट
कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. तसेच या कचऱ्यामध्ये पाळीव जनावरे, भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात येत आहेत. सांडपाण्याची निर्गत करण्यासाठी गटारीच नसल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी तुंबून राहिले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील कचरा उठा वेळेत करून नागरी सुविधांची सोडवणूक करावी.
-संजय व्हनागडे, नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Klb22b00964 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top