एसटी आणि दुचाकीचा कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अपघात... पती ठार पत्नी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी आणि दुचाकीचा कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अपघात... पती ठार पत्नी  जखमी
एसटी आणि दुचाकीचा कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अपघात... पती ठार पत्नी जखमी

एसटी आणि दुचाकीचा कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अपघात... पती ठार पत्नी जखमी

sakal_logo
By

१६०१
१६०२

नागावातील दुचाकीस्वार ठार
पत्नी जखमी; कळंब्यानजीक एसटीने दिली दुचाकीला धडक
सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. २ ः कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गावर घोडके मळ्यानजीक एसटीने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. चंदर तुकाराम कांबळे (वय ४२ रा. नागाव ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी सारिका (वय ३५) गंभीर जखमी आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आज दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. एसटीचालक संदीप गणपती पाटील (चंद्रे, ता. राधानगरी) याच्यावर गुन्हा नोंद केला असून, त्याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे कोल्हापूर गारगोटी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कळंब्याच्या पोलिसपाटील अनिता तिवले व करवीर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून अपघातग्रस्तांना सरकारी रुग्णालयात दाखल केले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी, चंदर कांबळे टिंबर मार्केटमध्ये टेंपो चालवून उदरनिर्वाह करतात. आज दुपारी एकच्या सुमारास कांबळे पत्नीसोबत दुचाकीवरून नागाव येथून कोल्हापूरकडे जात होते. घोडके मळ्यानजीकच्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या एसटी (एमएच ०६ एस ८३६०) ने दुचाकी (एमएच ०९ एएस ३९८१) ला जोरदार धडक दिली. त्यामुळे चंदर दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सारिका जखमी झाल्या असून, त्यांच्या हाता पायाला दुखापत झाली. त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

खड्डेच खड्डे
या धोकादायक वळणावर अनेकांचा जीव गेला असून, वाहनांचे नुकसान झाले आहे. मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने येथील खड्ड्यांची डागडुजी करून घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Klb22b00999 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..