पा ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा ३
पा ३

पा ३

sakal_logo
By

पतौडी खणीत पैलवान बुडाला
---
अग्निशामक, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
कळंबा, ता. १८ ः रंकाळ्यानजीक पतौडी खणीत पैलवान शंकर बाजीराव चौगुले (वय २७, हनुमाननगर, कळंबा कारागृहाच्या मागील बाजूस) हे पोहायला गेले असता बुडाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आज दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत खणीत अग्निशामक दल, पाणबुड्या उदय निंबाळकर व नागरिकांच्या मदतीने चौगुले यांची शोधमोहीम सुरू होती. घटनेची जुना राजवाडा पोलिसांत नोंद झाली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः शंकर चौगुले न्यू मोतीबाग तालमीत कुस्तीसाठी सराव करतात. आज रंकाळ्यानजीकच्या पतौडी खणीत मित्र इम्रान यांच्याबरोबर पोहायला गेले होते. शंकर यांनी खणीत सूर मारून मध्यापर्यंत पोहत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज लागला नसल्याने ते अचानक बुडू लागले. या वेळी काठाला बसलेल्या इम्रान यांच्या लक्षात ही घटना आल्यावर त्यांनी आरडाओरडा करीत येथे फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना याबाबत सांगितले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दल व पोलिसांना याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान, पोलिस पथक, पाणबुड्या निंबाळकर, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, अशोक रेडेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खणीत शंकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. परंतु, ते आढळून आले नाहीत. म्हणून शोधमोहीम थांबविण्यात आली असून, उद्या (ता. १९) पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. शंकर यांचे वडील बाजीराव भिवा चौगुले हे (कै.) रुस्तुम-हिंद दादू चौगुले यांचे चुलत भाऊ आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Klb22b01013 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..