
तपोवन मैदान येथे सतेज कृषी प्रदर्शन आढावा बैठक
01675
कृषी प्रदर्शन आढावा बैठकीवेळी बोलताना आमदार पाटील, धीरज पाटील, विनोद पाटील, स्वप्नील सावंत व मान्यवर
तपोवन मैदानात २३ पासून
सतेज कृषी प्रदर्शन
कळंबा, ता. 12 ः ’पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन तपोवन मैदानात 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर कालावधीत भरेल. अवजारे, बियाणे, फळे, फुले आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तूंचे 250 हून अधिक स्टॉल असतील, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. मंडप उभारणीचा प्रारंभ व आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सरकारी योजनांची माहिती, वित्त साह्य, कमी खर्चात जादा उत्पन्नासाठी मार्गदर्शन, अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फुले, फळबाग लागवड, ऊसशेती, मत्स्य व्यवसाय, गूळ उत्पादनासह शेती व्यवसायसंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन होईल. महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंची विक्री केली जाईल. बैठकीवेळी नूडल अधिकारी उमेश पाटील, कृषी विकास अधिकारी भीमा पाटील, जिल्हा अधीक्षक जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक रवींद्र पाठक, अधिकारी रमाकांत कांबळेंसह तज्ञांनी चर्चा केली. प्रदर्शनाचे आयोजन कायस्टार इव्हेंट्सचे स्वप्निल सावंत,जिल्हा खते, बी-बियाणे विक्री केंद्राचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी नगरसेवक धीरज पाटील यांनी केले आहे. यावेळी शारगंधर मधुकर रामाने, सरपंच सुमन गुरव, अर्जुन माने, इंद्रजीत बोंद्रे, दुर्वास कदम, राहुल माने, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, विश्वास गुरव, उदय जाधव, नागरिक उपस्थित होते.